Satara Crime : दुकानदार महिलेचे दागिने हिसकावले : संभाजीनगरातील प्रकार; दोघा चोरट्यांवर गुन्हा

एक जण दुचाकीवरच बसून राहिला दुसरा उतरून दुकानात आला. दुकानात आलेल्‍या युवकाने पेन खरेदीच्‍या बहाण्‍याने विद्यादेवी महाडिक यांना बोलण्‍यात गुंतवले. याचदरम्‍यान त्‍या युवकाने विद्यादेवी महाडिक यांच्‍या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्‍याचा प्रयत्‍न केला.
Chain Snatching
Chain Snatchingsakal
Updated on

सातारा : पेन खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या युवकाने दुकानदार महिलेच्‍या गळ्यातील ४० हजारांचे सोन्‍याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. संभाजीनगर येथे हा प्रकार घडला असून, शहर पोलिस ठाण्‍यात अनोळखी दोघा चोरट्यांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com