Pasarni Ghat : सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त! पसरणी घाटात एसटीनं प्राध्यापिकेला चिरडलं, पतीही जखमी

वाईतील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन पती-पत्नी जात होते पाचगणीला
Bus Accident at Pasarni Ghat
Bus Accident at Pasarni Ghatesakal
Summary

प्रीती या किसन वीर महाविद्यालयात (KisanVeer College) प्राध्यापक होत्या. पती योगेश पाचगणी येथील सेंट पीटर निवासी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.

वाई : पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात (Pasarni Ghat) एसटी बसचे (Bus Accident) ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील प्राध्यापक महिलेचा (Women Professor) मृत्यू झाला. दुचाकीचे पूर्ण नुकसान झाले. प्रीती योगेश बोधे (वय ४०, रा. पाचगणी) असे मृत महिलेचे नाव आहे.

Bus Accident at Pasarni Ghat
Satara : आधी वडिलांचं अपघाती निधन आणि आता 21 वर्षाची लेकही..; उदयनराजेंनी लिहिली हृदयद्रावक पोस्ट

पाचगणी येथील योगेश दामोदर बोधे व पत्नी प्रीती हे दोघे दुचाकीवरून (एमएच १२ एयू ६०६७) काल सायंकाळी सातच्या सुमारास पसरणी घाटातून पाचगणीला जात होते. या वेळी बुवासाहेब मंदिरानजीक स्वारगेटहून महाबळेश्वरला निघालेली बसचे (एमएच ०६ एस ८०५४) ब्रेक फेल झाल्याने ती उतारने वेगात मागे आली.

Bus Accident at Pasarni Ghat
Kolhapur : हातकणंगलेत राडा; ताबूत विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा लाठीमार, जमावाच्या चेंगराचेंगरीत महिलांसह लहान मुलं जखमी

त्याखाली बोधे यांची दुचाकी जाऊन झालेल्या अपघातात प्रीती बोधे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.

Bus Accident at Pasarni Ghat
Congress MLA : 'मविआ'ला बसणार मोठा धक्का? अजित पवारांनंतर काँग्रेसचे आमदार फुटणार; भाजप खासदाराच्या दाव्याने खळबळ

या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. प्रीती या किसन वीर महाविद्यालयात (KisanVeer College) प्राध्यापक होत्या. पती योगेश पाचगणी येथील सेंट पीटर निवासी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. वाई येथील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन ते दोघे पाचगणीला जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com