अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; दहिवडीत आंदोलन

Maan Taluka Health Department
Maan Taluka Health Departmentesakal

दहिवडी (सातारा) : समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या (Health Officer) मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील (Maan Taluka Health Department) समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजे आरोग्य उपकेंद्रात (Pathardi Taluka Karanji Health Sub-Center) ६ जुलै रोजी नियमित लसीकरण सुरू होते. त्यावेळी तिथे कार्यरत असणारे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके (Health Officer Dr. Ganesh Shelke) यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास गळफास लावून लसीकरणाच्या ठिकाणीच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. (Work stoppage agitation of health officials at Dahiwadi Satara Marathi News)

Summary

समुदाय आरोग्य अधिकाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी माण तालुक्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले.

तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. या घटनेचा वरिष्ठ पोलिस यंत्रणेकडून सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करून डॉ. गणेश शेळके यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. तुषार खाडे, डॉ. समीना तांबोळी, नम्रता ओंबासे, डॉ. प्रसाद आवळे, डॉ. सचिन गाडे, डॉ. प्रसाद ओंबासे, डॉ. दिनेश गंबरे, डॉ. सुजित खाडे, डॉ. पूनम पुजारी, डॉ. संजीवनी गोळे, विवेकानंद गिरगावकर, रोहित पाटील व माधुरी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Maan Taluka Health Department
Corona Vaccination : आरोग्य केंद्रात 'वशिला' असेल, तरच मिळणार लस!

डॉ. गणेश शेळके हा आमचा सहकारी निष्ठुर व मुर्दाड व्यवस्थेचा बळी ठरला आहे. आगामी तीन दिवसांत दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

-डॉ. विजय लोखंडे, अध्यक्ष, समुदाय आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र

Work stoppage agitation of health officials at Dahiwadi Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com