esakal | Corona Vaccination : आरोग्य केंद्रात 'वशिला' असेल, तरच मिळणार लस!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळविताना स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Corona Vaccination : आरोग्य केंद्रात 'वशिला' असेल, तरच मिळणार लस!

sakal_logo
By
प्रशांत गुजर

सायगाव (सातारा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Saigaon Primary Health Center) लस (Corona vaccination) मिळविताना स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, येथे वशिला असणारांनाच लस मिळत आहे. बाकीच्यांना गेले कित्येक दिवस हेलपाटे मारूनही लस मिळत नसल्याने काळाबाजार उघड होत आहे. केंद्रात लस येते किती, ही माहितीही मिळत नाही. येणाऱ्या लशीपेक्षा कमी लस सांगून तेवढ्याच टोकणचे वाटप करून वशिल्याच्या लोकांना देऊन पहाटेपासून उभ्या असणाऱ्यांना लशीविना माघारी फिरावे लागत आहे. (Queues Of Citizens For Vaccination At Saigaon Primary Health Center Satara Marathi News)

आरोग्य विभागातील (Department of Health) कर्मचाऱ्यांचे जवळचे नातलग, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा वशिला लावलेल्या लोकांना टोकण न घेता दिवसभर मागच्या दाराने लस मिळत आहे. हे लोक आपल्या जवळच्या लोकांसाठी अनेक टोकण घेत आहेत. मात्र, रांगेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला एकाच टोकणवर समाधान मानावे लागते. काही आरोग्य कर्मचारी (Health workers) तालुक्याबाहेरील जवळच्या नातेवाईकांना येथे लस देत आहेत. मागील शनिवारी येथील आरोग्य केंद्रासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ७० लशी होत्या. मात्र, त्याच्यापेक्षा जास्त लसीकरण त्यादिवशी झाल्याने हा काळाबाजार कोणालाच कळला नाही. कारण त्याच दिवशी ९४ नंबरचे टोकण असणाऱ्या स्थानिक ग्रामस्थाला लस मिळाली नाही.

हेही वाचा: चिंता वाढली! साताऱ्यात 24 तासात रुग्णसंख्या हजार पार

मात्र, वशिला असणाऱ्या बाहेरच्यांना मिळाली. या केंद्राला येणारी लस नक्की कोणासाठी, आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी, डॉक्टरांच्या मित्रमंडळीसाठी, स्थानिक पुढाऱ्यांसाठी, का सामान्य नागरिकांसाठी अशी जोरदार चर्चा सुरू आहे. गटविकास अधिकारी सतीश बुद्धेंनी (Group Development Officer Satish Buddhe) केंद्रास भेट देऊन माहिती घेतली तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी शनिवारी लस संपल्याचे सांगितले. मात्र, रविवारी सुटीच्या दिवशी येथे ३० लोकांचे लसीकरण कसे झाले, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांच्या संगनमताने काहींना ऑफलाइनही लस देऊन नंतर ती ऑनलाइन झाल्याने लसीकरणाचा काळाबाजार थांबविण्याची मागणी सचिन भोसले (खर्शी) यांच्यासह स्थानिकांकडून होत आहे.

Vaccination

Vaccination

हेही वाचा: ग्रामीण भागात कहर! टाकेवाडीला कोरोनाचा घट्ट विळखा

सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरत्र वशिलेबाजी न होता पारदर्शक पद्धतीने लसीकरण होईल, यासाठी योग्य ती काळजी यापुढे घेतली जाईल.

-सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, जावळी

हेही वाचा: पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघात ठिकाणांची सुधारणा करा

आरोग्य विभागातील कोणीही लसीकरणाबाबत खोटी माहिती देऊ नये. याबाबत केंद्रातील कर्मचाऱ्यांना समज दिल्याने तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई करू.

-डॉ. भगवान मोहिते, तालुका वैद्यकीय अधिकारी, जावळी

Queues Of Citizens For Vaccination At Saigaon Primary Health Center Satara Marathi News

loading image