कोपर्डेत हजारोंच्या उपस्थितीत यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपर्डेत हजारोंच्या उपस्थितीत यात्रा

कोपर्डेत हजारोंच्या उपस्थितीत यात्रा

सातारा (कोपर्डे हवेली) : सिद्धनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आज येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा झाली. हजारो भाविकांनी यात्रेस उपस्थिती लावली होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेली यात्रा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात भरलेली होती. पुन्हा कोरोनाचे संकट येऊ नये म्हणून भाविकांनी सिद्धनाथाला साकडं घातलं.

येथील सिद्धनाथ देवस्थान जागृत म्हणून ओळखले जाते. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नियम पाळून रथोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची पूजा करून गाव प्रदक्षिणा काढण्यात आली. कऱ्हाड- मसूर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर पोलिस वाहतूक सुरळीत करत होते.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

सकाळी देवाची आरती करून सकाळी साडेसात वाजता सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या मूर्तीची रथातून नगर प्रदक्षिणास सुरुवात झाली. रथापुढे सासनकाठी होती. ठिकठिकाणी रथ दर्शनासाठी थांबवला. नवसाचे तोरण सासनकाठीला बांधण्यासाठी भाविक गर्दी करत होते. ठिकठिकाणी फटाक्याची आतषबाजी केली जात होती. रथापुढे लयबद्ध वाद्य वाजवले जात होते. साडेचार वाजता रथ मंदिराजवळ आला आणि रथोत्सवाची सांगता झाली.

loading image
go to top