युवा वर्गाने सायकलचा वापर वाढविल्यास प्रदुषण कमी हाेईल : प्रणाली चिकटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pranali Chikate

युवा वर्गाने सायकलचा वापर वाढविल्यास प्रदुषण कमी हाेईल

सातारा : बदलती जीवनशैली त्यामुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास याबाबत समाजात जागृती आणि बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने पर्यावरण संवर्धन बचाव सायकल यात्रा सुरू केलेली प्रणाली बेबी विठ्ठल चिकटे (pranali chikate) नुकतीच क-हाड येथे आली हाेती. (yavatmal-girl-pranali-chikate-appeals-youths-to-use-bicycle-satara-news)

सुमारे दहा हजार किलाेमीटर अंतराचा टप्पा सायकलवरुन पार करत अवघ्या २१ वर्षाच्या तरुणीच्या या धाडसाचे काैतुक करण्यासाठी क-हाड परिसरातील पुरुष, महिला व युवा वर्ग मोठ्या प्रमाणात तिच्या स्वागतासाठी आले. युवा वर्गाने जास्ती जास्त सायकलचा वापर केल्यास त्यांचे आराेग्य ठणठणीत राहील तसेच प्रदुषणही कमी हाेईल असे प्रणालीने नमूद केले.

हेही वाचा: मतदारांनाे! 'कृष्णा’ च्या निवडणुकीत असे करा मतदान

यवतमाळ जिल्ह्यातल्या पुनवट या छोट्याशा गावातून पर्यावरणप्रेमी प्रणाली चिकटे या युवतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन राज्यभरात दौरा सुरू केला आहे. तिने 28 ऑक्टोबर 2020 ला सायकलवरून एकटीने हा प्रवास सुरु केला. प्रणालीने तिचा हा प्रवास यवतमाळहून सुरु केला. नागपूर, अमरावती, नाशिक, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली असा 21 जिल्ह्याचा सायकलवरून प्रवास करत ती सातारा जिल्ह्यातील क-हाड येथे नुकतीच आली हाेती. तब्बल दहा हजार किलाेमीटर प्रवासाचा टप्पा तिने पार केला आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रभर भ्रमंतीसाठी निघालेल्या प्रणाली चिकटेचे येथे आधार सामाजिक संस्थेतर्फे स्वागत झाले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रणाली राज्यभर भ्रमंती करते आहे. आधार सामाजिक सेवा संस्थेने येथे तीचा सत्कार केला. इथपर्यंत येईपर्यंत तीने नऊ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास सायकलने केला होता. ‘निसर्ग वाचवा आणि प्रदूषण टाळा’ असा संदेश ती देत आहे. आधारतर्फे तीचे स्वागत झाले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनेश मेटकरी, संचालक विक्रम शिरतोडे, तुषार जाधव, श्री. देवकर, सतीश पाटील, पूर्वा जाधव उपस्थीत होते.

21 year old pranali chikate is traveling by bicycle for environmental conservation Marathi News

21 year old pranali chikate is traveling by bicycle for environmental conservation Marathi News

हेही वाचा: गटशिक्षणाधिकार्‍याविरोधात विनयभंगाचा गुन्‍हा दाखल

बदलती जीवनशैली त्यामुळे पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास, याबाबत समाजात जागृती आणि बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने प्रणीलीने ही पर्यावरण संवर्धन बचाव यात्रा सुरू केल्याचे नमूद केले. पुणे, मुंबई, नगर मार्गे ती 31 डिसेंबरला आपल्या वाढदिनी यवतमाळातील आपल्या गावी पोहचणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहचवण्याचे काम करत आहे. यामध्ये युवकांना विना कारण हाॅर्न वाजवू नये यामुळे ध्वनी प्रदुषण कमी हाेण्यास मदत हाेते असेही सांगितले. ती म्हणाली युवा वर्गाने जास्ती जास्त सायकलचा वापर केल्यास त्यांचे आराेग्य ठणणीत राहील तसेच प्रदुषणही कमी हाेईल.

हेही वाचा: VIDEO : पर्यावरणसंवर्धनासाठी शेतकरी कन्येचे महाराष्ट्र भ्रमण; आतापर्यंत ६ हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास

हेही वाचा: दक्षिण काशी वाईतील श्री महागणपती (ढोल्या)

Web Title: Yavatmal Girl Pranali Chikate Appeals Youths To Use Bicycle Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataraBicycle