

पाटण : अडुळपेठ येथे आज रात्री साडेआठ वाजता मोटारसायकल व ट्रकच्या अपघातात येराड येथील युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार झाला आहे. नारायण तुकाराम साळुंखे असे मृत युवकाचे नाव आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.