Mahabaleshwar : हळद उतरण्याआधीच नवविवाहितेचा मृत्यू; लग्नानंतर पाचव्याच दिवशी सुटली 'संसारगाठ'

हळद उतरवण्याचा कार्यक्रम होण्यापूर्वी नवविवाहितेची प्रकृती अचानक बिघडली.
Aarti Satish Walnekar
Aarti Satish Walnekaresakal
Summary

आरती आणि सतीश यांच्या शुभविवाहामुळे लग्नघरातील वातावरण खुलून गेलं होतं. नातेवाईकांची लगबगही सुरू होती. दोघांच्या संसाराची रेशीमगाठ बांधली गेली होती.

महाबळेश्वर (सातारा) : महाबळेश्वर तालुक्यातील तापोळ्याजवळ वाळणे या गावातील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर (वय 25) हिचा उलटी, जुलाबाचा त्रास झाल्याने तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात (Tapola Health Centre) उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

मात्र, उपचाराआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, तर वाळणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Aarti Satish Walnekar
Rajya Sabha MP : 'या' 12 खासदारांवर होणार मोठी कारवाई; सभापतींनी चौकशीसाठी समितीकडं पाठवली नावं

महाबळेश्वर पोलिस ठाण्याकडून (Mahabaleshwar Police Station) मिळालेली माहिती अशी, की महाबळेश्वरपासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर वाळणे या गावात सतीश वाळणेकर यांचे लग्न आरती मुसळे हिच्यासोबत कारगाव (ता. खोपोली, जि. रायगड) येथे अवघ्या पाच दिवसांपूर्वी ता. 14 फेब्रुवारी रोजी झाला. ता. 16 लग्नाची पूजा झाली व 19 रोजी आज हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता; परंतु विवाहितेची प्रकृती बिघडल्याने तिला तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Aarti Satish Walnekar
Political News : शिवसेनेच्या आमदाराचा हिशोब चुकता करणार; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा थेट इशारा

मात्र, उपचारांआधीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक डॅा. शीतल जानवे- खराडे, पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रऊफ इनामदार, राजू मुलाणी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com