Cyber Crime Branch officials with arrested suspects in Vadgaon Haveli online fraud case.Sakal
सातारा
Karad : वडगाव हवेलीतील युवतीची ऑनलाइन फसवणूक: दोघांना अटक; दादर सायबर गुन्हे शाखेकडून संशयित वर्ग, नेमका काय प्रकार?
Satara News : प्रगती जगताप हिचे जिल्हा बँकेत खाते असून, त्या खात्यावर फेब्रुवारी २०२४ मध्ये एक लाख ३३ हजार रुपयांचे शैक्षणिक कर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी ४८ हजार रुपये २४ जुलै २०२४ ला प्रगतीच्या खात्यावर जमा झाले.
कऱ्हाड : मुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दोघांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार संबंधित युवतीच्या फिर्यादीवरून दोन्ही संशयितांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रगती प्रताप जगताप (रा. वडगाव हवेली) हिने याबाबतची फिर्याद दिली. याप्रकरणी दिन मोहम्मद जाकीर (वय २७, रा. किनगाव, ता. पुन्हाना, जि. नूह, मेवात, हरियाना) व आसिफअली ताहीर हुसेन (वय २२, रा. खानपूर-घाटी, मेवात, हरियाना) यांना अटक केली आहे.

