

Wrestler Rahul Korde Passes Away at 20
Esakal
मायणीतील एका कुस्तीपटूचा काल कन्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन उमेदीच्या वयात विसाव्या वर्षी पैलवान राहुल कोरडे याचे निधन झाल्याने कुस्ती क्षेत्रात व मायणी परिसरात शोककळा पसरली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पैलवान राहुल यास लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्याची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असताना वडील मोलमजुरी, आई सूप दुरडी तयार करून त्याची कुस्तीची आवड जोपासत होते. Maharashtra Kesari Medalist Dies Young