
-अविनाश काशीद
पुसेसावळी : सध्याच्या युगात वडिलोपार्जित संपत्तीसाठी सख्खा भाऊ देखील वैरी होतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्याची माणसे दुरावत चालली असल्याचे आपण पाहतो; परंतु छोट्या भावाने मोठ्या बंधूस स्वतःचे यकृत (लिव्हर) देऊन बंधुप्रेम जपत जीवनदान दिले असून, अवयवदान हेच श्रेष्ठदान असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.