Satara Crime: 'विनयभंगप्रकरणी युवकास अटक'; युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास
Youth Arrested for Molestation: युवतीचा पाठलाग करत वारंवार विनयभंग करणाऱ्या संशयित तरुणावर कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहीम राबवली. संशयितास चोवीस तासांत गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. जून २०२४ पासून आठ जुलै २०२५ पर्यंत या तरुणाकडून युवतीचा मानसिक छळ होत होता.
Youth arrested for molestation after harassing and stalking a young woman repeatedly.Sakal
कऱ्हाड : तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय युवतीचा विनयभंग करून तिची बदनामी करणाऱ्या युवकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित युवतीचा सतत पाठलाग करून मानसिक त्रास देणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.