ओझर्डे येथे कृष्णा नदीत शिरगावचा युवक बुडाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth from Shirgaon drowned in Krishna river

ओझर्डे येथे कृष्णा नदीत शिरगावचा युवक बुडाला

वाई : ओझर्डे (ता. वाई) येथील कृष्णा नदीच्या पात्रात शिरगावचा वेदांत वसंत चव्हाण( वय 16) हा बुडल्याची घटना रविवारी सकाळी 10.30 वाजता घडली. त्याचा शोध महाबळेश्वर ट्रेकर्सकडून सायंकाळी उशिरा पर्यत सुरू होता. मात्र, काहीच हाती आले नसल्याने सायंकाळी उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली. याबाबत घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरगाव गावची यात्रा जवळ आल्याने घरातील गोधड्या धुण्यासाठी शिरगाव मधून लोक रविवारी सकाळी ओझर्डे येथील कृष्णा नदी काठी आले होते.

गोधड्या धुवून अंघोळ करण्यासाठी वेदांत हा नदीत पोहण्यासाठी उतरला होता. नदी पात्र अत्यंत खोल आहे. त्यामध्ये वेदांत आधीच गोधड्या धुतल्यामुळे दमलेला होता. अशामध्ये त्याचा दम पाण्यातून बाहेर येताना संपला व तो पाण्यात बुडू लागला. हे बाहेर काठावर असलेल्या ग्रामस्थांनी पाहिले व त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु तो नदी पात्रात बुडाला. पट्टीचे पोहणाऱ्यानी शोध घेतला परंतु त्याचा शोध लागला नाही. याची माहिती भुईज पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी दुपारी महाबळेश्वर ट्रेकर्सना बोलवून शोध मोहीम राबविण्यात आली. सांयकाळी उशिरापर्यत शोध लागला नव्हता.