
विजयनगर येथे गेल्यावर त्यांच्या दुचाकीला अनोळख्या वाहनाने धडक दिली. हा अपघात पाहणाऱ्या दोघांनी त्यांना ओळखले.
कऱ्हाड : पहाटे व्यायामास निघालेल्या कर्नाटकातील युवकास अनोळख्या वाहनाने ठोकर दिली. त्यात संबंधित युवक जागीच ठार झाला आहे. कऱ्हाड ते चिपळूण रस्त्यावर येथून जवळच विजयनगर येथे पहाटे सहाच्या सुमारास अपघात झाला.
हणंमत भीमसेन इटकर (वय 27, रा. कटपाडे जि. उडपी) असे संबंधित युवकाचे नाव आहे. संबंधित युवक केसे पाडळी येथील मुकुंद गोविंद कुऱ्हाडे यांचा जावई आहे. दोनच दिवसांपूर्वी तो सासरी आला होता. मात्र, बुधवारी पहाटेच्या अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
मांढरदेव दरीतील मृतदेह रत्नागिरीच्या युवकाचा; खूनाचा पत्नीचा दावा
पोलिसांनी सांगितले की, त्याबाबत कुऱ्हाडे यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यांचे जावई हणमंत इटकर दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या बालाजीनगर- पाडळी येथे आले होते. बुधवारी सकाळी सव्वा पाचच्या सुमारास ते घरून दुचाकीने विमानतळाकडे व्यायामासाठी निघाले होते. विजयनगर येथे गेल्यावर त्यांच्या दुचाकीला अनोळख्या वाहनाने धडक दिली. हा अपघात पाहणाऱ्या दोघांनी त्यांना ओळखले.
दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन
त्यांनी बालाजी कॉलनी येथे येऊन कुऱ्हाडे यांना त्याची माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिले. त्या वेळी त्यांचे जावई हणमत इटकर रस्त्यावर पडले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांनी त्वरित पोलिसात माहिती दिली. त्यात कुऱ्हाडे यांनी अनोळखी वाहनाने ठोकरल्याची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे.
Edited By : Siddharth Latkar