
एमआयडीसीत कामावर निघालेल्या दोन तरुणांचा पांगरीत भीषण अपघात झाला आहे.
गोंदवले (सातारा) : शिरवळ येथे कामावर हजर राहण्यासाठी निघालेल्या गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील दोन युवकांच्या दुचाकीचा व ट्रकचा (Two wheeler-Truck Accident) पांगरी (माण) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सूर्यकांत लाला जाधव (वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश बबन कट्टे (वय 27) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय.
शिरवळ येथील एमआयडीसीत (Shirwal MIDC) कामाला असलेले सूर्यकांत जाधव व महेश कट्टे हे दुचाकीवरून (एमएच 11 डीसी 8927) निघाले होते. पांगरीजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची ट्रक (एमएच 12 एफ झेड 8977) जोरदार धडक झाली. यामध्ये जबर मार लागल्यामुळं सूर्यकांत याचा जागीच मृत्यू झाला, तर महेश गंभीर जखमी झाला आहे. शांत व मनमिळावू स्वभाव असलेल्या सूर्यकांत जाधव याचा गेल्या दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.