सातारा : प्रत्येक प्राथमिक केंद्रात ऑक्‍सिजनची सुविधा

सातारा : प्रत्येक प्राथमिक केंद्रात ऑक्‍सिजनची सुविधा

सातारा : कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, तसेच ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने बेड उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्‍सिजन बेडची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन खरेदी करून त्या माध्यमातून आरोग्य केंद्रातील एका रूममध्ये ऑक्‍सिजन बेड तयार केला जाणार आहे. त्यामुळे किमान ग्रामीण भागातील धाप लागलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकणार आहेत.

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल, डॅशबोर्डची सुविधा तसेच रेमडिसिव्हरची इंजेक्‍शन्स उपलब्ध करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. यातील डॅशबोर्डची सुविधा सुरू झाली आहे. किमान यातून नेमका कोणत्या प्रकारचा बेड कोठे उपलब्ध आहे, हे समजत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळू शकत आहे. पण, यामध्येही काही काही त्रुटी 
आहेत, त्या दूर करणे आवश्‍यक आहे. तर जम्बो हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या दाेन दिवसांत तेही सुरू होणार आहे. आता रेमडिसिव्हरचे इंजेक्‍शनची मागणीही प्रशासनाने केलेली आहे, अद्यापपर्यंत ही इंजेक्‍शन्स कंपन्यांकडून उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे काळ्याबाजारातून जादा दराने इंजेक्‍शन्स उपलब्ध होत आहेत.

इचलकरंजी- पुणे प्रवासात युवतीस छेडले; शिरवळला युवकास चाेप
 
कोविडबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज लागते. अशावेळी वेळेत बेड मिळेल याची शाश्‍वती नाही. यावर पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांतच अशी सोय करता येऊ शकते का, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी एक ऑक्‍सिजन बेड तयार करण्याचा मानस आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रातील एका रूममध्ये पोर्टेबल ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून तेथे रुग्णांची सोय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. येत्या आठवडाभरात यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून ऑक्‍सिजन बेडसाठी शहरातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची धावपळ थांबणार आहे.

पुण्याप्रमाणे साता-यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालकांना हवी वेळ
 
प्रत्येक प्राथमिक केंद्रात ऑक्‍सिजनचे सिलिंडर व पाइपलाइन बसविणे परवडणारे नाही. त्यासाठी तेथे पोर्टेबल ऑक्‍सिजन (ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन) बसविले जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कोविडसाठी मिळालेल्या निधीतून तसेच इतर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असे मशिन उपलब्ध करणार आहे. त्यामुळे आगामी काळात आरोग्य केंद्रातही ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असलेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत.

ढिंग टांग : गॉट वेल सून!  


जिल्ह्यातील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना 

जीवरक्षक ठरलेल्या रेमडिसिव्हरच्या इंजेक्‍शनचा अद्याप कंपन्यांकडून पुरवठा झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने पाच हजार इंजेक्‍शन्सची मागणी केलेली आहे. पण, ती उपलब्ध होऊ शकलेली नाहीत. आता पालकमंत्री तसेच गृहराज्यमंत्री व जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी यासाठी शासनस्तरावरून पाठपुरावा करून तातडीने ही इंजेक्‍शन्स उपलब्ध करायला हवीत. तरच सर्वसामान्य गंभीर रुग्णांचा जीव वाचणार आहे. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com