संक्रातीनंतर का होतेय थंडी कमी? कारण....

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

संक्रांतीनंतर सूर्य पुन्हा त्याचा प्रवास उत्तर गोलार्धाच्या दिशेने सुरू करतो. त्यामुळे त्याची आतापर्यंत तिरपी पडणारी किरणे सरळ पडू लागतात. उत्तरेच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास जूनपर्यंत पूर्ण होतो.

पुणे : मकर संक्रांतीनंतर सूर्याचे सुरू झालेल्या उत्तरायणामुळे उत्तर गोलार्धातील थंडीचा कडाका कमी होऊ लागलाय. त्यामुळे पुण्यात सोमवारी सकाळी साडेआठ वाजता किमान तापमानाचा पारा 13.8 अंश सेल्सिअस नोंदला गेला. मुंबई 19.3 तर नवी दिल्ली येथे मात्र अद्यापही हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असल्याने तेथे किमान तापमान 8.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विषुवृत्तामुळे पृथ्वीचे दोन भागात विभाजन झालंय. वरचा भाग उत्तर गोलार्ध तर, त्याच्या विरुद्ध असलेल्या भागाला दक्षिण गोलार्ध म्हटले गेले. त्यावर विषूवृत्त हे शून्य अक्षांशावर असते. तर, उत्तर गोलार्धात साडेतेवीस उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धात साडेतेवीस अक्षांशावर मकरवृत्त असते. डिसेंबरमध्ये सूर्यदक्षिण गोलार्धात असतो. त्यामुळे उत्तर गोलार्धात सूर्याची किरणे तिरपी पडतात. त्यामुळे तेथे उन्हाळा सुरू होतो.  भारत हा उत्तर गोलार्धात असल्याने नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत आपल्याकडे कडाक्‍याची थंडी आपल्याला जाणवते. अर्थात तापमान कमी किंवा जास्त होणे हे त्या भागात बाष्पाचे प्रमाण किती आहे, यावर अवलंबून असते. यंदा राज्याच्या बहुतांश भागात हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त होते. त्याचा परिणाम म्हणून बहुतांश वेळ 10 पेक्षा जास्त अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पण, याच वेळी उत्तर भारतात विशेषतः काश्‍मिर खोरे, हिमालयातील पर्वत रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवर्षा सुरू होती. तेथून येणाऱ्या महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील थंडीची लाट निर्माण होते. यंदाच्या हिवाळ्यात पुणे, नाशिक वगळता फारशी थंडीची लाट निर्माण झाल्याचे निरीक्षण हवामान खात्याने टिपले नाही.

PHOTOS : गारवेलच्या तीन प्रजातींचा शोध 

संक्रांतीनंतर सूर्य पुन्हा त्याचा प्रवास उत्तर गोलार्धाच्या दिशेने सुरू करतो. त्यामुळे त्याची आतापर्यंत तिरपी पडणारी किरणे सरळ पडू लागतात. उत्तरेच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास जूनपर्यंत पूर्ण होतो. त्यामुळे फेब्रुवारीनंतर उत्तर भारतातील थंडीचा कडाका हळूहळू कमी होतो. सध्या हीच प्रक्रिया सुरू असल्याने पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका कमी होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why cold temperature is decreasing in winter after sun transition