तापमानानुसार बदलणारा 'हेअरकलर'

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

ब्रिटन - वेगवेगळ्या प्रकारचे 'हेअरकलर' सध्या फॅशनमध्ये इन आहे. कपड्यांनुसार मॅचिंग असे विविध रंगाचे 'हेअरकलर' आपण बघतोच. परंतु, सध्या तापमानामुसार बदलणारा हेअरकलर फॅशनच्या जगात लोकप्रिय होत आहे. ब्रिटन येथील एका कंपनीने 'फायर' नावाचा हा 'हेअरडाय' नुकताच बाजारात आणला आहे. 

फॅशन डिझायनर लॉरेन बॉकर यांनी, 90च्या दशकात आलेल्या 'द क्राफ्ट' या चित्रपटातून अशाप्रकारचा हेअरकलर तयार करण्याची कप्लना सुचल्याचे म्हटले आहे. तसेच अशाप्रकारे रंग तयार करण्यासाठी रसायनशास्त्रज्ञांची देखील मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

वातावरणातील तापमानाचा, हवेतील बाष्पाचा, आणि शरिरातील तापनाचा या प्रकारच्या रंगावर परिणाम होतो. त्यामुळे तापमानात बदल झाला की केसांचा रंगही बदलतो, असे बॉकर यांनी सांगितले.   

बॉकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात मिळणाऱ्या इतर रंगांप्रमाणेच या रंगातही रसायनांचा वापर करण्यात आला आहे. तरिदेखील केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक घटक कमी करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. तसेच हा बाजारात मिळणाऱ्या इतर रंगांसारखाच रंग असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. तसेच, या रंगाचा परिणाम फार काळ टिकत नाही. दोन, तीन वेळा केस धुतल्यानंतर केसांचा रंग पूर्ववत होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This “Magic” Hair Dye Changes Color Depending on Temperature