वायफायपेक्षा 100पट वेगवान लायफाय

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

वेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान "लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे.

अत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या एलईडी बल्बच्या साहाय्याने लायफाय काम करते. या आधुनिक तंत्रज्ञानातून एक जीबी प्रतिसेकंद या प्रचंड वेगाने माहिती पाठविता येते. पारंपरिक वायफाय तंत्रज्ञानापेक्षा हा वेग शंभर पटीने अधिक आहे. या वेगामुळे म्युझिक अल्बम, एचडी फिल्म्स आणि व्हिडिओ गेम्स काही सेकंदांत डाऊनलोड करता येतील. अर्थात, डाटा पाठविण्याच्या पद्धतीनुसार हा वेग कमीही होऊ शकतो. या अतिवेगवान तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा असून, ते प्रकाशावर अवलंबून असल्यामुळे भिंतीमधून प्रसारित होऊ शकत नाही.

"लायफाय'च्या प्रचंड वेगामुळे सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित असणाऱ्या काही ऍप्लीकेशन्समध्येही मोठा फरक पडू शकतो. व्हेलमेन्नीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सोलंकी म्हणाले,""येत्या तीन ते चार वर्षांमध्ये हे तंत्रज्ञान ग्राहकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता त्याच्यामुळे वायफाय अडगळीत पडण्याची शक्‍यता नसून वायफायबरोबर इंटरनेटचा वेग आणि कार्य क्षमता वाढविण्यासाठी ते काम
करेल.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 times faster than WiFi lifi