esakal | गोपनियता धोक्यात! चौदा प्रसिद्ध अॅप्सकडून कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक
sakal

बोलून बातमी शोधा

hacker

गोपनियता धोक्यात! चौदा प्रसिद्ध अॅप्सकडून कोट्यवधी युजर्सचा डेटा लीक

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या काही प्रसिद्ध अॅप्सकडून कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरला जात असल्याचं समोर आलं आहे. सायबर सुरक्षा तपासणाऱ्यांनी अशी डझनभराहून अधिक लोकप्रिय अॅन्ड्रॉईड अॅप्स शोधून काढले आहेत. ज्यांना गुगलच्या प्ले स्टोअरवरुन १४० मिलियनहून (१४ कोटी) अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

सायबरन्यूजच्या नव्या तपासणीत १४ टॉपचे अँड्रॉईड अॅप आढळून आले आहेत. ज्यांना सामुहिक स्वरुपात १४२.५ मिलियन वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. जे गुगलच्या मालकीच्या फायरबेस प्लॅटफॉर्मवर चुकीच्या पद्धतीनं कॉन्फिगर करण्यात आले होते. या टूलचा उपयोग अँड्रॉईड अॅप बनवण्यासाठी केला जातो. जर यामध्ये सर्वकाही व्यवस्थितपणे कॉन्फिगर केलं गेलं नाही तर तो गंभीर समस्या निर्माण करु शकतो.

या प्रकरणी फायरबेस चुकीच्या कॉन्फिग्रेशनमुळं असे अॅप्स संवेदनशील युजर डेटा जसे ई-मेल, युजर नेम, अँड्रॉइड युजरचं खरं नाव आणि बरचं काही लीक करु शकते. संशोधकांनी म्हटलंय की, हे चुकीचं कॉन्फिगरेशन अशा कोणत्याही व्यक्तीसमोर करु शकतात ज्याला कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय युजरची माहिती एकत्र करणाऱ्या रिअल टाईम डेटाबेसपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य युआरएल माहिती असते.

तीन कोटी युजर्सना अजूनही धोका, गुगलचं मौन

सायबरन्यूजनं म्हटलं की, आपल्या निष्कर्षांवर आधारित तांत्रिक दिग्गजांना सावध करण्यासाठी तसेच अॅप्सचा डेटाबेस सुरक्षित ठेवण्यासाठी गुगलशी संपर्क साधला. परंतू त्यांचा शोधनिबंध प्रकाशित होईपर्यंत अँड्रॉईड निर्माता आणि प्ले स्टोअर ऑपरेटर असलेल्या गुगलनं कोणतंही उत्तर दिलं नाही. सायबरन्यूजने दाखवून दिलेल्या १४ अँड्रॉइड अॅपपैकी ९ अॅप्स अद्यापही डेटा लीक करत आहेत. यामुळे ३० मिलियनहून (३ कोटी) अधिक युजर्सला धोका आहे.

loading image
go to top