मोटोरोला घेऊन येतेय 200MP कॅमेरा फोन, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

200mp camera phone moto edge 30 ultra camera sample appears check details here

मोटोरोला घेऊन येतेय 200MP कॅमेरा फोन, जाणून घ्या डिटेल्स

Motorola Edge 30 Ultra : Motorola झपाट्याने आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. आता कंपनी एक नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन- Moto Edge 30 Ultra आणणार आहे. हा 200MP कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असेल. हा आगामी स्मार्टफोन गेल्या काही आठवड्यांपासून खूप चर्चेत आहे. जगभरातील वापरकर्ते 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. यूजर्सचा हा उत्साह आणखी वाढवण्यासाठी कंपनीने फोनचा कॅमेरा सॅम्पल शेअर केले आहे.

Weibo वर शेअर केलेले कॅमेरा सॅम्पल पाहता, असे म्हणता येईल की फोनच्या कॅमेऱ्याची गुणवत्ता खरोखरच उत्तम आहे. कंपनीने शेअर केलेला फोटो 50 मेगापिक्सेलचा आहे. हा फोटो वेबोवर शेअर करण्यासाठी कंप्रेस केला होता, जेणेकरून तो वेबसाइटवर सहज अपलोड करता येईल. या फोटोच्या फायनल आउटपुटमध्ये सेन्सर्सची 4-इन-1 पिक्सेल प्रोसेसिंग वापरली गेली आहे.

Motorola Edge 30 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये कंपनी 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.73-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देणार आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून, तुम्हाला त्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट देण्यात येईल. फोटोग्राफीसाठी कंपनी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देणार आहे.

हेही वाचा: नेटफ्लिक्सची मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी, लवकरच मिळणार स्वस्त प्लॅन

यामध्ये 200-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह 50-मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर आणि 12-मेगापिक्सेल सेन्सरचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. मोटोरोलाचा हा आगामी स्मार्टफोन 4500mAh बॅटरीसह येईल, जो 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. हा फोन Android 11 वर आधारित MyUX OS वर काम करेल. कंपनीचा हा फोन याच महिन्यात चीनमध्ये लॉन्च होणार आहे. चीनमध्ये कंपनी याला Moto X30 Pro नावाने लॉन्च करणार आहे.

हेही वाचा: Jio, Airtel अन् Vi बेस्ट प्लॅन! दररोज 3GB डेटा, फ्री कॉलसह मिळेल बरंच

Web Title: 200mp Camera Phone Moto Edge 30 Ultra Camera Sample Appears Check Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology