Mahindra Alturas G4 : महिंद्राच्या SUV चा नवीन स्वस्त व्हेरिएंट लॉंच, वाचा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2022 mahindra alturas g4 2wd high variant launched in india check price and features

Mahindra Alturas G4 : महिंद्राच्या SUV चा नवीन स्वस्त व्हेरिएंट लॉंच, वाचा डिटेल्स

देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने त्यांच्या फ्लॅगशिप SUV Alturas G4 च्या व्हेरियंट लाइन-अपमध्ये एक नवीन व्हेरिएंट लॉन्च केला आहे. महिंद्राने Alturas G4 लाइन-अपमध्ये एक नवीन अधिक परवडणारी 2WD हाय व्हेरिएंट सादर केला आहे ज्यामध्ये 4WD मॉडेलची अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

नवीन 2022 Mahindra Alturas G4 2WD हाय व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 30.68 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिएंट 4WD मॉडेलच्या खाली पोजिशन करण्यात आले आहे, ज्याची सध्या किंमत 31.88 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. या किंमतीमुळे Alturas G4 भारतीय बाजारपेठेतील सर्वात परवडणारी पूर्ण-आकाराची SUV ठरली आहे.

बदलांबद्दल बोलयाचे झाल्यास , नवीन Alturas G4 2WD हाय व्हेरियंटमध्ये सर्व फीचर्स मिळतात जी पूर्वी फक्त रेंज-टॉपिंग 4WD मॉडेलसह देण्यात आली होती. उदाहरणार्थ, SUV च्या 2WD हाय व्हेरियंटमध्ये आता रेन-सेन्सिंग वायपर, ऑटोमॅटिक हेडलॅम्प, मेमरी फंक्शनसह ड्रायव्हरच्या सीटसाठी इलेक्ट्रॉनिक ऍडजस्टमेंट आणि स्टँडर्ड पॉवर टेलगेट मिळते.

हेही वाचा: TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्स

फीचर्स

Mahindra Alturas G4 मध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हेटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 6-स्पीकर साउंड सिस्टम यांसारखे फीचर्स देखील मिळतात.

सेफ्टी फीचर्स

सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर यात 9 एअरबॅग्ज, EBD सह ABS, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, ESP, हिल स्टार्ट असिस्ट, डिसेंट कंट्रोल आणि बरेच काही देण्यात आले आहे.

हेही वाचा: फ्लिपकार्ट सेलमध्ये 'या' फोनची विक्री सर्वाधिक; किंमत 15 हजारांपेक्षा कमी

इंजिन

Mahindra Alturas G4 च्या मकॅनिकल स्पेसिफिकेशन्समध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीयेत आणि ती तशीच आहेत. यात अजूनही BS-VI 2.2-लीटर टर्बो डिझेल इंजिन आहे. हे इंजिन 181 bhp पॉवर आणि 420 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे मर्सिडीज-बेंझ कडून घेतले आहे आणि याला RWD ड्राइव्हट्रेन मिळते.

भारतीय बाजारपेठेत, Mahindra Alturas G4 ही टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर, इसुझू एमयू-एक्स, जीप मेरिडियन सारख्या कारशी स्पर्धा करते .

Web Title: 2022 Mahindra Alturas G4 2wd High Variant Launched In India Check Price And Features

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mahindra and Mahindra