
लॉंच होताच Maruti ही कार ठरतेय हीट; ग्राहकांकडून प्रचंड मागणी
2022 Maruti Suzuki Baleno ने लॉन्च झाल्यापासून एका महिन्यात 50,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या महिन्यात किंमत जाहीर होण्यापूर्वीच बलेनोने 25,000 बुकिंगचा टप्पा ओलांडला होता. कंपनीने भारतात Baleno लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
2022 मारुती सुझुकी बलेनो अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्स, एक्सटीरियर और इंटीरियरमध्ये अनेक अपडेट्स करत बाजारात दाखल झाली होती. दरम्यान नवीन बलेनोची सुरुवातीची किंमत 6.35 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
फीचर्स काय आहेत?
जर आपण त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर कंपनीने ते जास्तीत जास्त चांगले बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, तुम्हाला नवीन तीन-स्तरीय डिझाइनने सजवलेले डॅशबोर्ड पहायला मिळेल, ज्यामध्ये टॉपला ब्लॅक, मध्यभागी सिल्व्हर अॅक्सेंट आणि तळाशी निळा रंग दिला आहे.
नवीन बलेनोचे डॅशबोर्ड डिझाइन जागतिक बाजारात विकल्या जाणाऱ्या नवीन एस-क्रॉससारखाच आहे. यात 9.0-इंचाचा स्मार्टप्ले प्रो, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अलेक्सा कनेक्ट, ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम यासारखी अनेक फीतर्स आहेत.
हेही वाचा: बापरे! जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित ठिकाणांपैकी 63 शहरं भारतात!
इंजिन
नवीन 2022 Baleno मध्ये, कंपनीने 1.2-लिटर क्षमतेचे K12N पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे VVT आणि इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे इंजिन कारचे मायलेज वाढवण्यास मदत करते. हे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे की, या कारचे मॅन्युअल व्हेरिएंट 22.35km/l आणि ऑटोमॅटिक व्हेरिएंट 22.94km/l मायलेज देते.
बाजारात मारुती सुझुकी 2022 बलेनोची स्पर्धा ही Hyundai i20, Honda Jazz, Tata Altroz शी होईल. कंपनी नेक्सा रिटेलच्या मदतीने बलेनोची विक्री करणार आहे, जे विशेषत: प्रीमियम सेगमेंटच्या कार विकण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यावर मारुती सुझुकी सियाझ, इग्निस, XL6 सारख्या गाड्या विकल्या जातात.
हेही वाचा: एका चार्जमध्ये चालेल 130 किमी; लाँच झाले दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Web Title: 2022 Maruti Suzuki Baleno Got 50000 Booking Check Its Price Mileage And All Details
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..