Maruti लवकरच लॉन्च करणार 'ही' नवीन कार; जाणून घ्या काय असेल खास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 2022 maruti xl6 facelift may launch  on 21st april marathi auto news

Maruti लवकरच लॉन्च करणार 'ही' नवीन कार; जाणून घ्या काय असेल खास

मारुती सुझुकी एप्रिल 2022 च्या तिसर्‍या आठवड्यात आपल्या वाहनांची दोन अपडेटेड मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2022 Maruti Ertiga फेसलिफ्ट आणि 2022 Maruti XL6 फेसलिफ्ट बाजारात आणण्याच्या तयारी करत आहे. कंपनीने अद्याप या वाहनांच्या लॉन्च तारखांचा खुलासा केला नसला तरी, नवीन XL6 ही येत्या 21 एप्रिल रोजी लॉन्च होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

2022 मारुती सुझुकी X6 फेसलिफ्ट (Maruti XL6 2022) च्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास रिपोर्ट्सनुसार, अपडेटेड मॉडेलमध्ये देखील सध्याच्या मॉडेलसारखेच इंजिन दिसेल, जे 1.5 लिटर 4 सिलेंडर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे आणि ते 103 bhp पॉवर आणि 138 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. XL6 फेसलिफ्टचे स्टँडर्ड व्हेरिएंट 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह पाहिले जाऊ शकते. कंपनी आपले सीएनजी मॉडेलही बाजारात आणणार आहे.

हेही वाचा: कोरोनाचा व्हेरिएंट XE भारतात दाखल! जाणून घ्या नेमकी काय आहेत लक्षणे

मारुती XL6 चे फेसलिफ्ट सध्याच्या मॉडेलपेक्षा महाग असण्याची शक्यता आहे. सध्याच्या मॉडेल्सची किंमत रु. 10.14 लाख ते रु. 12.02 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. लॉन्च झाल्यानंतर, ही कार Kia Carens शी स्पर्धा करेल, जी एक प्रीमियम MPV कार आहे.

XL6 मध्ये Apple CarPlay आणि Android Auto, वायरलेस फोन चार्जिंग, लेदर सीट्स, ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग आणि सुधारित एअरकॉन कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांसह येण्याची शक्यता आहे. अफवा अशी आहे की ऑटोमेकर 7-सीट कॉन्फिगरेशनसह अपडेटेड XL6 देखील देऊ शकते.

हेही वाचा: कायद्याचा दुरुपयोग होतोय; ED च्या कारवाईनंतर राऊतांचा राज्यसभेत आरोप

Web Title: 2022 Maruti Xl6 Facelift May Launch On 21st April Marathi Auto News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobile
go to top