Robot Marathon : चीनमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत धावले २१ रोबो! मानवी स्पर्धकांबरोबर प्रथमच भाग; २१ किलोमीटरची औत्सुक्यपूर्ण शर्यत
Beijing Marathon : बीजिंगमधील यिझुआंग येथे शनिवारी झालेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत २१ रोबो सहभागी झाले होते. त्यांनी मानवी स्पर्धकांबरोबर २१ किलोमीटरची शर्यत पूर्ण केली, हे एक महत्त्वाचे तांत्रिक चमत्कार ठरले.
बीजिंग : बीजिंगमधील यिझुआंग येथे शनिवारी आयोजित केलेल्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत एक वैज्ञानिक चमत्कार पाहायला मिळाला. या शर्यतीत भाग घेतलेल्या शेकडो स्पर्धकांबरोबर प्रथमच २१ रोबो धावले. त्यांनी २१ किलोमीटरची ही शर्यत गाजविली.