नवं तंत्रज्ञान  "फोर डी' वस्तू प्रत्यक्षात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

अमेरिकेतील कार्नेज मेलॉन विद्यापीठाने "फोर डी वस्तूंचे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. विद्यापीठाच्या "मॉर्फिंग मॅटर लॅब'मध्ये फोर डी प्रिटिंगचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

अमेरिकेतील कार्नेज मेलॉन विद्यापीठाने "फोर डी वस्तूंचे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. विद्यापीठाच्या "मॉर्फिंग मॅटर लॅब'मध्ये फोर डी प्रिटिंगचे नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. प्लॅस्टिकच्या सपाट वस्तू विविध आकारात तयार करण्यासाठी थ्रीडी प्रिंटरचा वापर संशोधकांनी केला. यात मानवी हस्तक्षेपाशिवाय थर्मोप्लॅस्टिक शीटमधून फोर डी आकार एका सेकंदात तयार होऊ शकतात. फर्निचरच्या वस्तू उदा. खुर्ची तसेच होडी, ससा असे आकार यात तयार होतात.

या प्रक्रियेत थ्रीडी प्रिंटरमधून बाहेर पडणाऱ्या वस्तू सपाट व कठीण प्लॅस्टिकच्या रूपात बाहेर पडतात. त्या गरम पाण्यात ठेवल्या की त्यांना घड्या पडण्यास सुरवात होते. या तंत्रज्ञानाचा वापर उपग्रहात होऊ शकतो, तसेच आपत्कालीन घरांसाठीही उपयुक्त ठरू शकते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4D new technology