5G Network: नेमकं कोणासाठी ठरणार 5G घातक? जाणून घ्या काय म्हणतं 'WHO'

5G Network नेमकं घातक कोणासाठी, एक्सपर्ट सांगतात खरं कारण
5G Network
5G Networkesakal

WHO: भारतात नुकतंच काही दिवसांपूर्वी जगातील सगळ्यात अॅडवांस आणि फास्ट नेटवर्क 5Gचं लाँचिंग झालंय. काही शहरांमध्ये यावर्षी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक शहरांमध्ये 5G सेवांनाही सुरूवात झाली आहे. मात्र 5G इलेक्ट्रोमॅग्नेडिटिक रेडिएशन क्रिएट करतं. 5G नेटवर्क उर्जा निर्माण करतं. हे नेटवर्क इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड तयार करतं. मात्र काहींच्या मते यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. जाणून घेऊया काय म्हणतात एक्सपर्ट.

5G नेटवर्कचा मानवी आरोग्यावर किती प्रभाव पडतो?

WHO च्या मते, 5G मध्ये वापरली जाणारी फ्रिक्वेंसीवर सिमित रिसर्च झालंय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डचा आरोग्यावर किती प्रभाव पडतो यावर अजून पूर्णत: अभ्यास करण्यात आलेला नाही. मात्र सध्या स्थितीत 5Gचा मानवी जिवास धोका असल्याचे सिद्ध झाले नाही.

5G नेटवर्कचा प्राण्यांच्या आरोग्यावर किती प्रभाव पडतो?

यावरही अजूनतरी फारसं संशोधन झालेलं नाही. २०१९ मध्ये झालेल्या रिसर्चनुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्डमुळे उंदरांचं डिएनए डॅमेज होत असल्याचं आढळून आलं. तर २०२० मध्ये लावण्यात आलेल्या एक शोधात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड मेंढ्यांच्या जिवास धोकादायक ठरतं.

5G Network
5G Network: तुमच्या फोनमध्ये चालणार का Airtel 5G कसे चेक कराल? 'या' ॲपने लगेच कळेल

हेल्थ रिस्कबाबत खोटे दावे

5G रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर आरोग्याबाबत बरेच खोटे पुढे आलेत.

१) कोरोना वॅक्सिनमध्ये 5G चिप्स असतात.

२) 5G चा उपयोग कोरोना महामारील कवर करण्यासाठी केला जातो.

३) 5G डोकेदुखी आणि मायग्रेनचं कारण ठरतं.

मात्र या सगळ्या दाव्यांना अजूनतरी अधिकृत स्पष्टीकरण नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com