5G Network: तुमच्या फोनमध्ये चालणार का Airtel 5G कसे चेक कराल? 'या' ॲपने लगेच कळेल

तुमच्या मोबाईलमध्ये 5G चालणार की नाही हे चेक करायचे असेल तर डाउनलोड करा एअरटेलचा हा ॲप
5G network
5G networkesakal

Aitel 5G network checking: आधी jIO 5G आणि आता Airtel 5G Plus सर्विस भारतात लाँच झाल्यापासून 5G सर्विसबाबत सगळं काही जाणून घेण्याकडे युजर्सचा कल दिसून येतो. त्यामुळे आता 4G नेटवर्क युजर्सना त्याच्या स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क चालणार की नाही असा प्रश्न पडला आहे. Airtel 5G नेटवर्क तुमच्या फोनमध्ये चालणार आहे की नाही ते तुम्ही Airtel ॲपच्या माध्यमातून चेक करू शकता.

सध्या Airtelची 5G सर्विस मोबाईलमध्ये चालणार की नाही याबाबत मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीमधील युजर्स चेक करू शकतील. यासोबतच कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, Airtel 4G सिम 5Gमध्ये अपग्रेट करण्याचीही गरज नाही. मात्र मुळात तुमच्या सिममध्ये 5G सिम चालणार आहे की नाही हे चेक करणं फार सोपं आहे.

असे चेक करा तुमच्या मोबाईलमध्ये 5G चालणार की नाही?

5G सर्विस तुमच्या मोबाईलमध्ये चालणार आहे काय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये Airtel Thanks App डाउनलोड करावा लागेल.

आता या अॅपला ओपन करा.

यानंतर कंपनी चेक करेल तुम्ही वर दिलेल्या शहरांमध्ये राहाता की नाही ते.

शिवाय तुमच्या हँडसेटमधील 5G काँपॅटिबीलीटीही चेक केली जाईल.

5G network
5G Launch Today: तुमच्या फोनमध्ये चालणार का jio 5G? वाचा मोबाईलची यादी

सेटींगमध्ये करावे लागतील हे बदल

वरील सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर एअरटेल अॅप तुम्हाला सेटिंगमध्ये जाण्यास सांगेल.

यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन नेटवर्क पेजवर जा.

त्यानंतर प्रीफर्ड नेटवर्कमध्ये 5G सीलेक्ट करा.

तुम्हाला यानंतर फोनमध्ये 5Gचं साईन येईल.

5G network
5G Network: भारतात 5Gची एन्ट्री पण 4Gचं काय? तुमच्या सिमचं पुढे काय होणार ते वाचा

माहितीसाठी कुठल्याच स्मार्टफोनमध्ये सध्या 5G नेटवर्क सपोर्ट करणार नाही. यासाठी कंपनीकडून लवकरच काही अपडेट्स जारी करण्यात येतील. नवे अपडेट तुम्हाला फोनच्या सेटींगमध्ये गेल्यानंतर अपडेटमध्ये चेक करता येतील. नवे अपडेट फोनमध्ये आल्यानंतरच बहुतेक स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क काम करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com