प्रतीक्षा संपली! PM मोदींच्या हस्ते 1 ऑक्टोबरला होणार 5G सेवेचा श्री गणेशा

5G लाँंचिंग झाल्यामुळे वापरकर्त्यांना 4G पेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळण्यास मदत होणार आहे.
5G network
5G networksakal

5G Network Launching : देशात 1 ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवेचा शुभारंभ करणार आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रगती मैदानावर होणारी 'इंडिया मोबाईल काँग्रेस' 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

5G network
Shivaji Park : ही तर शिंदेंची खेळी; BKC वर शिवतीर्थापेक्षा तोबा गर्दी जमवणार?

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, सरकारने अल्प कालावधीत देशात 5G दूरसंचार सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या टप्प्यात 5G सेवा देशभरातील सुमारे 13 शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे.

5G वापरकर्त्यांना 4G पेक्षा 10 पट जास्त इंटरनेट स्पीड मिळेल असेही वैष्णव म्हणाले होते. तसेच, 5G सेवेद्वारे निर्माण होणाऱ्या रेडिएशनची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा खूपच कमी असल्याचेही स्पष्ट केले होते.

5G network
कंन्फर्म! लवकरच येतोय Redmi चा सर्वात स्वस्त 5G फोन; 'या' तारखेला होईल लॉन्च

पहिल्या टप्प्यात केवळ 13 निवडक शहरांना हायस्पीड 5G इंटरनेट सेवा मिळेल. या शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे यांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे वर नमूद केलेल्या या शहरांतील प्रत्येक नागरिकाला 5G सेवा मिळू शकत नाही. हे शक्य आहे की दूरसंचार कंपन्या या शहरांमधील निवडक भागात 5G सुविधा प्रदान करतील ज्याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com