50MP कॅमेऱ्यासह 5G Smartphone लॉन्च; मिळेल १५०० रुपयांपर्यंत सवलत

स्मार्टफोनची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल तपशीलवार माहिती देऊ.
5G phone
5G phonegoogle

मुंबई : स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने भारतात Moto G82 लॉन्च केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन 10-बिट AMOLED डिस्प्ले, मजबूत बॅटरी आणि मजबूत कॅमेराने सुसज्ज आहे. स्मार्टफोनची किंमत २५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, म्हणून आम्ही तुम्हाला या स्मार्टफोनबद्दल तपशीलवार माहिती देऊ.

Moto G82 5G वैशिष्ट्ये

Moto G82 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + पोलराइज्ड डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. Moto G82 5G Qualcomm Snapdragon 695 SoC सह सुसज्ज आहे. याशिवाय कंपनीचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 30W चार्जिंग आउट-ऑफ-द-बॉक्स सपोर्ट करते. फोनचे वजन सुमारे १७३ ग्रॅम आहे आणि त्याची जाडी ७.९९ मिमी आहे.

पॉवर बॅकअपसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Moto G82 भारतात 13 5G बँडसाठी सपोर्टसह येतो. यात साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर काम करतो. फोन ब्लूटूथ 5.1, वायफाय 802.11 a/b/g/n/ac ला सपोर्ट करतो.

Moto G82 5G भारत किंमत आणि ऑफर

Moto G82 भारतात दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजची किंमत २१ हजार ४९९ रुपये आहे. तर फोनच्या 8GB + 128GB स्टोरेज पर्यायाची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. बँक ऑफरबद्दल बोलायचे तर, तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरून १ हजार ५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. Moto G82 5G फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि प्रमुख रिटेल स्टोअरमधून खरेदी करता येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com