ट्‌विटरवरील सुमारे 60टक्के लिंक्‍स दुर्लक्षितच

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

नवी दिल्ली - ट्‌विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर शेअर करण्यात आलेल्या लिंक्‍सपैकी 59 टक्के लिंक्‍स या पाहिल्याच जात नसल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि कोलंबिया विद्यापीठाने केलेल्या या अभ्यासात काहीवेळा तर केवळ लिंक शेअर करणारी व्यक्तीही त्या लिंकला ओपन करून पाहत नसल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. 

यासाठी सुमारे महिनाभर ट्‌विटरवरील 28 लाख लिंक्‍सचा अभ्यास करण्यात आला, यामध्ये बीबीसी, सीएनएन, फॉक्‍स न्यूज, द न्यू यॉर्क टाइम्स आणि हफिंगटन पोस्ट सारख्या नामांकित संकेतस्थळांच्या लिंक्‍सचा समावेश होता. ट्‌विटरवर "ब्लॉकबस्टर‘च्या आर्टीकल्सना मात्र चांगले क्‍लिक मिळत असले तरी त्यांचे क्‍लिकचे प्रमाण हे केवळ नऊ टक्के असल्याचेही येथे नमूद करण्यात आले आहे. 

सोशल मिडियावर अतिशयोक्ती असलेली शीर्षके ही स्वत:च स्वत:चा पराभव करून घेणारी ठरत असल्याचेही या अभ्यासात समोर आले आहे. अतिशयोक्ती असलेल्या लिंक्‍सकडेही अनेकांनी दुर्लक्षच करणे पसंत केले आहे. याउलट सनसनाटी किंवा दिशाभूल करणारी शीर्षके लोक आवर्जून वाचतात लिंक्‍सवर क्‍लिक करून त्याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतात असेही येथे दिसले आहे. अर्थातच सोशल शेअरिंगमुळे बातमीच्या परिणामावर पडणारा प्रभाव हा गौण असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 60 % links on Twitter goes unnoticed by users