Smartphone Hidden Features : मोबाईलमध्ये लपलेले 'हे' 8 ‘स्मार्ट’ फीचर्स तुम्हाला माहिती असायलाच हवेत

Mobile Hidden Features : स्मार्टफोनमध्ये लपलेली ही ८ भन्नाट फीचर्स तुमचे दैनंदिन काम अधिक सोयीस्कर आणि वेगवान करतील. आता मोबाईलचा वापर होईल खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’!
Smartphone Hidden Features
Smartphone Hidden Featuresesakal
Updated on

Mobile Smart Features : आजच्या घडीला स्मार्टफोन हा केवळ संवादाचे साधन राहिलेला नाही तर तो आपले वैयक्तिक सहायक बनलेला आहे. पण बऱ्याचदा आपण या स्मार्टफोनमधील अनेक उपयुक्त आणि लपलेल्या फीचर्सकडे दुर्लक्ष करतो. Android असो वा iPhone, या हिडन फीचर्सचा योग्य वापर केल्यास तुमचा वेळ वाचू शकतो, कामात उत्पादकता वाढू शकते आणि एकंदर स्मार्टफोनचा एकदम भारी बनतो. चला तर मग, अशाच ८ उपयोगी आणि स्मार्टफोनमधील ‘हिडन’ ट्रिक्स जाणून घेऊया.

1. स्क्रीन पिनिंग (Android वापरकर्त्यांसाठी खास)

जर तुम्हाला तुमचा फोन दुसऱ्याला द्यायचा असेल पण त्याने फक्त एकच अ‍ॅप वापरावं अशी इच्छा असेल, तर स्क्रीन पिनिंग हे उत्तम फीचर आहे. एकदा हे फीचर सुरू केल्यावर, तुमचा फोन केवळ त्या अ‍ॅपवरच लॉक होतो. इतर अ‍ॅप्समध्ये डोकावता येत नाही.

कसे वापरावे-
Settings > Security > Screen Pinning

2. बॅक टॅप (iPhone वापरकर्त्यांसाठी)

iOS 14 किंवा त्याहून नवीन सिस्टीम असलेल्या iPhone मध्ये, बॅक टॅप फीचरद्वारे तुम्ही फोन्सच्या मागच्या बाजूस दोन किंवा तीन टॅप करून स्क्रीनशॉट घेऊ शकता, अ‍ॅप उघडू शकता किंवा इतर क्रिया करू शकता.

कसे वापरावे-
Settings > Accessibility > Touch > Back Tap

Smartphone Hidden Features
Whatsapp Hacking Safety : कधीच हॅक होणार नाही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप! पोलिसांनी सांगितली भन्नाट ट्रिक, पाहा एका क्लिकवर

3. वन-हॅन्ड मोड (एक हाताने वापरण्याची सोय)

मोठ्या स्क्रीनमुळे फोन हाताळताना अडचण येते? वनहॅन्ड मोडमुळे स्क्रीन खाली किंवा एका बाजूला सरकवता येते, ज्यामुळे अंगठ्याने सर्व ऑपरेशन्स करणे सोपे जाते.

Android:
Settings > System > Gestures > One-handed mode
iPhone (Face ID वाले):
स्क्रीनच्या खालच्या भागावर स्वाइप करा

4. Wi-Fi QR कोड शेअर करा – पासवर्ड सांगण्याची गरज नाही!

Wi-Fi शेअर करताना पासवर्ड टाईप करण्याऐवजी, तुम्ही QR कोडद्वारे लगेच नेटवर्क शेअर करू शकता.

कसे वापरावे-
Settings > Wi-Fi > कनेक्टेड नेटवर्कवर टॅप करा > Share (QR code दिसेल)

Smartphone Hidden Features
Whatsapp New Feature : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भन्नाट फीचरची एंट्री! तुमचं इंटरनेट वाचणार अन् स्टोरेजही फुल नाही होणार, एकदा बघाच

5. फिंगरप्रिंटने अ‍ॅप्स लॉक करा (Android वापरकर्त्यांसाठी)

तुमच्या खासगी चॅट्स, मेल्स किंवा बँकिंग अ‍ॅप्ससाठी एक्स्ट्रा सिक्युरिटी हवी आहे? फिंगरप्रिंटने अ‍ॅप्स लॉक करा

कसे वापरावे-
Settings मध्ये “App Lock” शोधा (ब्रँडनुसार वेगवेगळं असू शकतं)

6. ड्रॅग आणि ड्रॉप

आधुनिक स्मार्टफोनमध्ये ड्रॅग आणि ड्रॉपची सोय आहे. फोटो गॅलरीमधून उचलून थेट WhatsApp वा मेलमध्ये ड्रॉप करा एकदम सोप्पं आणि फास्ट!

Smartphone Hidden Features
Jio Recharge : जिओने आणला 'पैसा वसूल' रिचार्ज पॅक! 90 दिवसांची वैधता, फ्री कॉलिंग, 200GB डेटा, OTT अन् किंमत फक्त...

7. व्हॉल्युम बटण वापरून कॅमेरा लगेच उघडा

फोटो काढायला वेळ नको? फक्त व्हॉल्युम किंवा पॉवर बटण दोनदा दाबा आणि कॅमेरा लगेच सुरू होईल.

8. बिल्ट-इन डॉक्युमेंट स्कॅनर

वेगळे अ‍ॅप डाउनलोड न करता, तुमच्या फोनमधील Notes (iPhone) किंवा Google Drive (Android) वापरून डॉक्युमेंट्स हाय क्वालिटीमध्ये स्कॅन करा.


हे फीचर्स वापरून स्मार्टफोनचा वापर अधिक स्मार्ट पद्धतीने करा. तुमचा वेळ, डेटा आणि मेहनत तिन्ही वाचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com