Online Review: ऑनलाइन शॉपिंगमध्ये रिव्ह्यूच्या नावाखाली मोठा घोटाळा; वाचा काय आहे प्रकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Review

Online Review : ऑनलाइन शॉपिंगमध्ये रिव्ह्यूच्या नावाखाली मोठा घोटाळा; वाचा काय आहे प्रकरण

ऑनलाइन खरेदी करताना चांगले रिव्ह्यू वाचूनच आपण वस्तू खरेदीकरतो. तुम्हीही असे करत असाल तर सावधान. कारण सध्या अनेक उत्पादनांना पैशासाठी रेट केले जात आहे. यामुळे ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना अनेक उत्पादनांना 4 ते 5 स्टार रेटिंग दिसते. परंतु प्रत्यक्षात अशी अनेक उत्पादने चांगले रिव्ह्यू असूनही खराब असतात.

याचे कारण, जे लोक या उत्पादनांचे रिव्ह्यू करतात. कंपन्या अशा लोकांना चांगले रिव्ह्यू देण्यासाठी बक्षिसे देतात.  म्हणजे पैसे आणि महागड्या भेटवस्तू देतात. ही फसवणूक लवकरच थांबू शकते कारण भारतीय मानक ब्युरो (BIS) ऑनलाइन खरेदीमध्ये उत्पादन किंवा सेवेच्या रिव्ह्यू पद्धतींमध्ये पारदर्शकता आणण्याची तयारी करत आहे.

हेही वाचा: Keyboard Invention : कीबोर्डचा शोध कधी आणि कोणी लावला? वाचा काय आहे इतिहास

भारतीय मानक ब्युरो (BIS) ने मागवल्या सूचना

भारतीय मानक ब्युरोने ऑनलाइन ग्राहक रिव्ह्यूच्या परीमानकासाठी एक मसुदा तयार केला आहे. या मसुद्यात, BIS ने सुचवले आहे की, ऑनलाइन वेबसाइट्सच्या प्रशासनाने कोणत्याही उत्पादन/सेवांच्या एकूण रेटिंगची गणना करताना पुरस्कारांच्या आधारे दिलेले रेटिंग समाविष्ट करू नये. अशा रिव्ह्यूची रेटिंग वेगळी असावी, जेणेकरून ग्राहकाला समजेल की, ते उर्वरित रिव्ह्यूपेक्षा वेगळे आहे. बहुतेक लोक ऑनलाइन साइट्सवर खरेदी करताना उत्पादन किंवा सेवांचे रिव्ह्यू पाहूनच खरेदीचा निर्णय घेतात. बहुतेक उत्पादनांची रिव्ह्यू आणि रेटिंग ई-कॉमर्स साइट्स, फूड डिलिव्हरी आणि किराणा साईट्सवर नोंदवले जातात.

हेही वाचा: Exchange Notes : तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत का? ‘अशा’ बदलता येतील नोटा

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने सर्व कंपन्यांना 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मसुद्यावरील सूचना सादर करण्यास सांगितले आहे. या मसुद्याच्या प्रस्तावात, ई-कॉमर्स कंपन्यांनी उत्पादन किंवा सेवेच्या एकूण रेटिंगचा अंदाज घेताना पुरस्कारांच्या आधारे दिलेले रेटिंग समाविष्ट करू नये. असे सुचवले आहे. मसुद्याच्या प्रस्तावात असेही म्हटले आहे की, अशा रिव्ह्यूचे रेटिंग वेगळे असावे. जेणेकरून ते उर्वरित रिव्ह्यूपेक्षा वेगळे असल्याचे ग्राहकांना समजेल. सध्या  ई-कॉमर्स साइट्सवर दिसणार्‍या रिव्ह्यूमध्ये रिव्ह्यू करणाऱ्यांची पूर्ण माहिती नसते. प्रस्तावाच्या मसुद्यानुसार, नवीन नियमांमध्ये उत्पादन खरेदी आणि वापरानंतर रिव्ह्यू करणाऱ्यांचा पत्ताचा देखील समावेश असेल.