समुद्राच्या तळाशी सापडले कोरोनावर रामबाण औषध! शास्त्रज्ञांना 'या' पदार्थावर अपेक्षा | Sci-Tech | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समुद्राच्या तळाशी सापडले कोरोनावर रामबाण औषध!
समुद्राच्या तळाशी सापडले कोरोनावर रामबाण औषध!

समुद्राच्या तळाशी सापडले कोरोनावर रामबाण औषध!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव दोन वर्षांपासून भेडसावत आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही ठोस उपचार सापडलेला नाही. यावर कायमस्वरूपी इलाज शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ (Scientist) प्रयत्न करत आहेत. मात्र, आता एक औषध सापडलंय जे कोरोना विषाणूचा संसर्ग केवळ थांबवतच नाही तर तो कोरोना मुळापासून बरा करतो. होय, आता शास्त्रज्ञांना समुद्राच्या तळात असा पदार्थ सापडला आहे, जो कोरोनावर कायमचा इलाज बनू शकतो.

वैद्यकशास्त्राच्या इतिहासात पेनिसिलिन हा सर्वात मोठा शोध असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे नैसर्गिकरीत्या उद्‌भवणारे प्रतिजैविक आहे. मात्र, यापासून उपचार कसे करायचे, हे कोणालाच माहीत नव्हते. जेव्हा उपचाराचा मार्ग सापडला तेव्हा इतिहासच बदलून गेला. त्यामुळे आता कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला अशा अँटीव्हायरलची गरज आहे, जी नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

हेही वाचा: बोकडांच्या मदतीने वीजनिर्मिती! दोन चिमुकल्यांचा आविष्कार

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) सागरी जीवजंतूंपासून सापडलेल्या पदार्थांपासून उपचार करण्यास संमती दिली आहे. यापैकी बरेच पदार्थ क्‍लिनिकल चाचण्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. असाच एक पदार्थ नुकताच शास्त्रज्ञांना समुद्रात सापडला आहे. हा पदार्थ समुद्री शैवाल, स्क्विड आणि माशांमध्ये आढळतो. त्यांना मरीन सल्फेट पॉलीसेकराइड्‌स (Marine Sulphated Polysaccharides - MSPs) म्हणतात.

मरीन सल्फेट पॉलिसेकेराइड्‌स (MSPs) हे विशेष प्रकारचे कार्बोहायड्रेट असून त्यात सल्फर (गंधक) असते. हे गंधक समुद्रातील शैवाल किंवा समुद्री शैवाल यांच्या पेशींच्या बाह्य भिंतींमध्ये साठवले जाते. हे काही मासे आणि खारफुटीच्या वनस्पतींमध्ये देखील आढळते. MSPs पदार्थांवर शास्त्रज्ञ सतत प्रयोग करत असतात. हर्पस सिम्प्लेक्‍स विषाणू, एचआयव्ही, चिकुनगुनिया, सायटोमेगॅलॉइरस, इन्फ्लूएंझा आणि हिपॅटायटीस विषाणू विरुद्ध त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे.

MSPs हे कोरोनाचे औषध असू शकते, असे मानूया. पण त्यासाठी सागरी शैवाल शोधणे, त्याला बाहेर काढणे, त्यावर प्रक्रिया करून त्यातून हा पदार्थ काढणे, नंतर त्याचे औषध किंवा लस बनवणे ही खूप लांब आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण चांगली बातमी अशी आहे, की समुद्रात मरीन सल्फेट पॉलीसेकेराइड्‌स (MSPs) असलेले शैवाल आणि समुद्री शैवाल यांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे जगभरातील लोकांसाठी त्यापासून लाखो औषधांचे डोस तयार केले जाऊ शकतात.

मरीन सल्फेट पॉलीसॅकराइड्‌ससंबंधी (MSPs) अनेक जुने संशोधन अहवाल शास्त्रज्ञांनी वाचले. त्यात असे आढळून आले की, गेल्या 25 वर्षांत 80 वैज्ञानिक अहवालांमध्ये एमएसपीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगण्यात आले आहे. या पदार्थात अनेक प्रकारचे विषाणू नष्ट करण्याची आणि त्यांचा संसर्ग रोखण्याची क्षमता आहे. यानंतर, शास्त्रज्ञांनी आणखी संशोधन केले आणि निसर्गातून असे 45 पदार्थ सापडले, ज्यात विषाणूविरोधी क्षमता आहे, परंतु त्यांचा शोध घेणे बाकी आहे.

हे 45 मरीन सल्फेट पॉलीसेकराइड्‌स (MSPs) विविध सागरी स्रोतांमधून येतात. उदाहरणार्थ, एकपेशीय वनस्पती, सूक्ष्म शैवाल, समुद्री काकडी, स्क्विड कार्टिलेज आदी. जेव्हा MSPs च्या रासायनिक कणांचे थ्रीडी कॉम्प्युटर मॉडेल तयार केले गेले, तेव्हा असे समजले की त्यात कोरोना विषाणूचे स्पाइक प्रोटीन मारले गेले. म्हणजेच कोरोनाचे आयुष्य संपले.

हेपरिन (Heparin) हे एमएसपीसारखेच रसायन आहे. आतापर्यंतच्या तपासणीत, ते कोरोना व्हायरसविरुद्ध खूप प्रभावी आहे. हे कोविड-19 च्या विषाणूमध्ये असलेल्या स्पाइक प्रोटीनला बांधते. कोरोना व्हायरस पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. समस्या अशी आहे, की हेपरिन हे रक्त पातळ करणारे आहे. त्यामुळे ते कोविड औषध म्हणून योग्य नाही.

हेही वाचा: स्मार्टफोन कॅमेराद्वारे हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड

शोधलेल्या 45 एमएसपींपैकी 9 मध्ये हेपरिनसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते कोविड-19 साठी प्रभावी औषध बनू शकतात. या 9 पदार्थांपासून भविष्यात कोरोनावर कायमस्वरूपी औषध किंवा लस बनवता येईल. उदाहरणार्थ, कॅरेजेनन, शैवालपासून तयार केलेला पदार्थ, सर्दीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनुनासिक स्प्रे आणि लोझेंजमध्ये वापरला जातो. कोविड-19 ला रोखण्यासाठी कॅरेजिनन हे प्रभावी औषध असू शकते. चाचणीतही याची पुष्टी झाली आहे.

loading image
go to top