सावधान! Smartphone कॅमेराद्वारे होतेय हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! स्मार्टफोन कॅमेराद्वारे होतेय हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड
सावधान! स्मार्टफोन कॅमेराद्वारे होतेय हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड

स्मार्टफोन कॅमेराद्वारे हेरगिरी; खासगी व्हिडिओ होताहेत रेकॉर्ड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्मार्टफोन वापरकर्त्यांवर बनावट अ‍ॅप्सचा (Apps) धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दररोज बनावट अ‍ॅप्सद्वारे वापरकर्त्यांचा डेटा चोरी आणि हेरगिरीच्या बातम्या येत आहेत. सायबर-सुरक्षा तज्ज्ञांनी आता अशा 20 हून अधिक अ‍ॅप्स ओळखल्या आहेत, जे फोनवरून फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह संपर्क तपशील आणि मेसेजेसमध्येही प्रवेश करतात.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

'हे' अ‍ॅप नाहीत प्ले स्टोअरवर

फोनस्पाय (PhoneSpy) नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून हॅकर्स यूजर्सच्या फोनची हेरगिरी करतात, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका ब्लॉगपोस्टमध्ये, एका यूएस सुरक्षा एजन्सीने उघड केले आहे की, या अ‍ॅपद्वारे 1 हजारांहून अधिक Android वापरकर्त्यांना हानी पोचली आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी 23 फोनस्पाय अ‍ॅप्स ओळखले आहेत. विशेष बाब म्हणजे, हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

ई-मेल आणि एसएमएसशीही खेळ

हे अ‍ॅप्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर ई-मेल किंवा एसएमएस लिंकद्वारे वितरित केले गेले. फोनस्पाय मालवेअरने संक्रमित उपकरणे दक्षिण कोरियामध्ये आहेत. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून इतर देशांतील स्मार्टफोन यूजर्सचीही हेरगिरी केली जात असल्याचे संशोधकांचे मत आहे.

हॅकर्स चोरतात फोनमध्ये सेव्ह केलेले फोटो

हे धोकादायक अ‍ॅप वापरकर्त्याच्या फोनमध्ये शांतपणे रन करतात आणि यूजर्सना ते लक्षातही येत नाही. झिम्पेरिअमचे संशोधक अझीम येसवंत यांनी सांगितले की, हे अ‍ॅप मोठ्या कल्पकतेने यूजर्सची हेरगिरी करतात आणि यूजर्सला याची माहितीही नसते. संशोधकांचा असा विश्वास आहे, की फोनस्पाय अ‍ॅपने फोनमध्ये सेव्ह केलेले खासगी संभाषण आणि फोटोंव्यतिरिक्त यूजर्सचे वैयक्तिक तपशीलही चोरले आहेत.

हेही वाचा: जेव्हा मध्यरात्री बंद घरातून येतो चित्रविचित्र आवाज, तेव्हा..!

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गूगल अकाउंटचे पासवर्डही झाले हॅक

संशोधकांच्या टीमने ओळखलेले फोनस्पाय अ‍ॅप हे योग, फोटो पाहणे किंवा इतर अ‍ॅक्‍टिव्हिटींचे बनावट ऍप्स आहेत. हे अ‍ॅप्स यूजर्सच्या फोनवर इन्स्टॉल केल्यानंतर कॅमेरा, GPS लोकेशन, टेक्‍स्ट मेसेज आणि फोन कॉन्टॅक्‍ट याशिवाय इतर गोष्टींमध्ये प्रवेश करतात. एवढेच नाही, तर हे अ‍ॅप्स यूजरचे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गूगल अकाउंटचे पासवर्डही हॅक करतात.

loading image
go to top