तुमचा आधार नंबर विसरलात? 'या' सोप्या पध्दतीने मिळवा ऑनलाईन

aadhar card
aadhar cardSakal

आधार कार्ड सध्या प्रत्योकासाठी अत्यंत महत्वाचे डॉक्यूमेंट बनले आहे, त्यामुळे तुमचे आधार कार्ड हरवले तर ते त्रासदायक ठरु शकते. अशा वेळी जर तुमचा आधार क्रमांक ऑनलाइन परत कसा मिळवायचा असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर ही बातमी वाचा...

आधार कार्ड हरवले असेल आणि ते परत ऑनलाइन मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला दिलेला 12-अंकी यूनिक क्रमांक आहे आणि तो सर्वत्र व्यक्तीची ओळखी म्हणून वापरला जातो. बँकेत तुमचे खाते उघडण्यापासून ते इतर सरकारी योजना आणि सेवांचा लाभ मिळवण्यापासून ते नोकरीसाठी अर्ज करण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे. पण तुमचे आधार कार्ड हरवले आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक (UID) आठवत नसेल तर? काळजी करू नका! तुम्ही तुमचा आधार क्रमांक सहजपणे ऑनलाइन मिळवू शकता.

त्यासाठी फक्त एकच आवश्यकता आहे की, तुमचा फोन नंबर UIDAI वर रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे, जो तुमच्या आधार कार्डशी जोडलेला आहे. याव्यतिरिक्त, तुमचा मोबाइल नंबरवर एसएमएस सुविधा सुरु असणे आवश्यक आहे.

aadhar card
Maruti Celerio कारचे बुकिंग सुरु; देईल देशातील सर्वाधिक मायलेज

तुमचा हरवलेला आधार कार्ड नंबर ऑनलाइन कसा मिळवायचा

तुमचा नावनोंदणी क्रमांक (EID) ऑनलाइन किंवा आधार कार्ड क्रमांक शोधण्यासाठी, तुम्हाला या पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील..

1. प्रथम UIDAI पोर्टलवर जा - तुमच्या ब्राउझरमध्ये https://resident.uidai.gov.in/ ही वेबसाईट उघडा.

2. '‘Aadhaar Services’ शोधण्यासाठी खाली स्क्रोल करा

3. ‘Retrieve Lost or Forgotten EID/UID’ टॅबवर क्लिक करा

4. त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल जेथे तुम्हाला ‘Aadhaar No (UID)’ वर क्लिक करावे लागेल.

5. त्यानंतर तुमचा वैयक्तिक तपशील जसे की नाव, तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एंटर करा.

6. त्यानंतर पेजवर C aptcha कोड एंटर करा.

7. पुढील स्टोपमध्ये 'ओटीपी पाठवा' वर क्लिक करा, जे तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडीवर सहा अंकी OTP पाठवेल.

8. पोर्टलवर सहा-अंकी OTP एंटर करा.

aadhar card
या दिवाळीत खरेदी करा इलेक्ट्रिक स्कूटर, हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

आधार कार्डची ई-कॉपी ऑनलाइन कशी मिळवायची?

तुमचा आधार क्रमांक तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर पाठवला जाईल. एकदा तुम्हाला तुमचा 12-अंकी आधार क्रमांक मिळाला की, तुम्ही त्याची ई-कॉपी देखील प्रिंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला UIDAI पोर्टलला पुन्हा भेट द्यावी लागेल आणि 'Get Aadhaar' सेक्शनमध्ये 'Download Aadhaar' वर क्लिक करा. तेथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक, आवश्यक कॅप्चा एंटर करा आणि पूर्वीच्या प्रक्रियेप्रमाणे तुम्हाला एक OTP मिळेल.

त्यानंतर, पुढील पेजवर 'अटी आणि नियम' वाचा आणि 'सबमिट' वर क्लिक करा. ते तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणी नसलेल्या मोबाइल क्रमांकातून एक निवडण्यास सांगेल. एकदा तुम्ही पहिला पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला पुन्हा कॅप्चा कोडसोबत तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. तुमची आधारची ई-कॉपी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पेमेंट करावे लागेल. तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, तुमचे आधार कार्ड तुम्हाला मिळून जाईल.

तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी तुमच्या आधार कार्डमध्ये रजिस्टर केलेला नसेल तर काय होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जर तुमचा मोबाईलनंबर किंवा ईमेल रजिस्टर केलेला नसेल तर तुम्हाल ऑनलाईन कॉपी डाऊनलोड करता येणार नाही. ते तुम्हाला ऑफलाइन करावे लागेल. तुम्हाला जवळच्या कायमस्वरूपी आधार नोंदणी केंद्रावर भेट देऊन ते करावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com