

Update Your Aadhaar Card : ज्यांच्या आधार कार्डला दहा वर्षे होऊन गेलेली आहेत, त्यांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागणार आहेत. जिल्ह्यात १७ लाख कार्डधारक आहेत. आधार केंद्रावर जाऊन अपडेट केल्यास ५० रुपये शुल्क आहे. तर संकेतस्थळावर जाऊन स्वतः ऑनलाइन अपडेट केल्यास तीन महिन्यांसाठी मोफत अपडेट करता येणार आहे.
आधार कार्ड क्रमांक ही राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची ओळख आहे. आज प्रत्येक कामासाठी आधार कार्ड ओळख पटवण्यासाठीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात आहे. दहा वर्षांनंतर प्रत्येकाच्या चेहरेपट्टीत, पत्त्यामध्ये बदल होत असतो. यामुळे आता कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.
दहा वर्षे होऊन गेलेले जिल्ह्यात सध्या १७ लाख कार्डधारक आहेत. त्यांना त्यांचे कार्ड अपडेट करून घेण्यासंदर्भात संदेश पाठवणे सुरू झाले आहे. माहिती व तंत्रज्ञानचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांनी सांगितले, जिल्ह्यामध्ये ९ एजन्सीमार्फत ३८१ ठिकाणी आधारसंदर्भात किट देण्यात आलेले आहेत. यापैकी १३८ ठिकाणी सिंगल बायोमॅट्रिक आहेत. इथे केवळ पत्ता आणि मोबाईल नंबर दुरुस्ती करता येते. तर उर्वरित आधार केंद्रांवर आधार कार्डची पूर्ण प्रक्रिया करता येते.
आधार केंद्र देताना कामाचे दर निश्चित करून देण्यात आलेले आहेत. चालकांनी ते दर आधार केंद्राच्या बाहेर दर्शनी भागात लावले पाहिजेत. तसेच जर कोणी जास्तीचे पैसे घेत असेल तर नागरिक १९४७ या क्रमांकावर तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या केंद्राची चौकशी केली जाते. तथ्य आढळले तर कारवाई केली जात असल्याचे दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.