
Aadhar Mobile Link : आधार कार्ड ला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही पाहिले तर तुमच्या आज घरातील खूप सार्या व्यक्तींचे अजून आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक झाला नसेल. तर मग आधार कार्ड ला मोबाईल नंबर मोबाईल मधूनच लिंक करता येतो का. तर याचे उत्तर नाही हे आहे.
आधार कार्डला मोबाईल नंबर आपण स्वतः लिंक करू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटर ला जाऊन आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागतो.
सरकारच्या निर्देशानुसार आता मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता हे काम तुम्ही घरबसल्या अगदी सहज करू शकता. IVR प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता ही प्रक्रिया अतिशय सोपी झाली आहे.
आधार कार्डचा वापर संपूर्ण देशात केला जात आहे. आधारकार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारने अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत आधार कार्ड लिंक करण्यास सांगितलं आहे. पण, त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारकार्डसोबत लिंक असणे खूप महत्त्वाचं आहे. आधारकार्डसोबत मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात.
तुम्हाला फक्त कोणत्याही मोबाइल फोनवरून 14546 वर कॉल करावा लागेल आणि आधार क्रमांक आपल्या मोबाइलशी जोडला जाईल. डिजिटल इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊयात.
आयव्हीआर प्रक्रियेमुळे (IVR Process) मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करणं सुलभ झालं आहे. मोबाइल फोनवरून 14546 या क्रमांकावर कॉल करून तुमचा मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करता येतो. हा क्रमांक डायल करण्यापूर्वी तुमच्याकडे ओटीपी जनरेट करण्यासाठी मोबाइल क्रमांक आणि तुमचं आधार कार्ड आहे की नाही हे तपासून पाहा.
'डिजिटल इंडिया' या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून या संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक करण्यासाठी एक सोपी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या पूर्ण करू शकता.
'या' सोप्या स्टेप्समध्ये मोबाइल नंबर आधारशी लिंक करा
यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाइल नंबरवरून 14546 या क्रमांकावर कॉल करावा. यानंतर तुम्ही भारतीय नागरिक आहात की एनआरआय (NRI) असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यापैकी एक पर्याय निवडा.
पर्याय निवडल्यानंतर आधार कार्ड तुमच्या मोबाइल क्रमांकाशी लिंक करण्याची अनुमती विचारली जाईल. तुम्ही मोबाइलवरून 1 प्रेस केला तर तुमची सहमती आहे, असं गृहीत धरलं जाईल.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक द्यावा लागेल आणि पुन्हा 1 दाबावा लागेल. जर तुम्ही चुकीचा आधार क्रमांक टाकला असेल तर तुम्हाला दुसरा पर्यायही मिळेल. यानंतर एक ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड जनरेट होईल जो तुमच्या मोबाईलवर येईल.
यानंतर आयव्हीआर प्रक्रियेने तुमच्याकडे मोबाइल क्रमांक मागितला जाईल. त्यानंतर तुमच्या मोबाइल ऑपरेटरला तुमचं नाव, फोटो, जन्मतारीख आदी माहिती द्यावी लागेल.
ही माहिती दिल्यावर आयव्हीआर तुमच्या मोबाइल क्रमांकातले शेवटचे चार क्रमांक वाचून दाखवेल आणि ते बरोबर आहेत का असा प्रश्न विचारेल.
तुमची कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुम्ही एसएमएसद्वारे आलेला ओटीपी टाकाल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला 1 दाबावा लागेल. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होऊन तुमचा मोबाइल नंबर आधारशी जोडला जाईल.
आयव्हीआर आपल्याला सूचित करेल की आधार आधारित मोबाइल नंबरची पुनर्पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल.
आयव्हीआर सुविधा एअरटेल, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी यापूर्वीच सुरू केली आहे. जिओ आणि बीएसएनएल लवकरच ही सुविधा सुरू करणार आहेत. या सुविधेमुळे आधार कार्डशी मोबाइल क्रमांक लिंक करणं अगदी सहज-सोपं झालं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.