रात्रीचा तीव्र प्रकाश आरोग्यासाठी हानिकारक!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

सामान्यपणे आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर तज्ज्ञांकडून जीवनशैली तपासून पाहण्याचा सल्ला दिला जातो. एका नव्या अभ्यासानुसार, जीवनशैलीबरोबच तुमच्या घराचीही बारकाईने पाहणी करणेही गरजेचे असल्याचे समोर आले आहे! घरातील प्रखर प्रकाश रात्रीच्या नैसर्गिक झोपेवर परिणाम करतो, हे सिद्ध झाले आहे. याचा शरीराच्या विकारांच्या निर्मितीसारख्या क्रियांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो व त्यातून लठ्ठपणा, टाइप2मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांशी संबंध येतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. कर्करोग संशोधक डॉ.रिचर्ड स्टिव्हन्स यांनी हा अभ्यास केला असून,"फिलोसॉफिकल ट्रान्झॅक्‍शन्स'या नियतकालिकात या बाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. या बाबत डॉ. स्टिव्हन्स म्हणाले,""नेहमीचा प्रखर प्रकाश आपल्या शरीरावर परिणाम करत असल्याचे आता स्पष्ट होत आहे. कमी तीव्रतेचे आणि लाल रंगातील दिवे बॉडी क्‍लॉकवर कमी परिणाम करत असल्याने लोकांनी संध्याकाळी आणि रात्री या दिव्यांचाच वापर करावा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acute harmful to health and the night light!