Elon Musk...तर ट्विटरसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे; इलॉन मस्क यांचं ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

Elon Musk...तर ट्विटरसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे; इलॉन मस्क यांचं ट्विट

वाशिंगटन : ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी शनिवारी ट्विट करून जाहीर केले की, कंपनीची सब्सक्रिप्शन सेवा वापरकर्त्यांना कमी जाहिराती दाखवेल. शिवाय जाहिरात-मुक्त सेगमेंट देखील उपलब्ध असेल. सोशल नेटवर्क ट्विटरला ऑक्टोबरमध्ये अधिग्रहण केल्यापासूनच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ( Elon Musk news in Marathi)

हेही वाचा: Buzz Aldrin : चंद्रावर चालणाऱ्या अंतराळवीराने केले ९३ व्या वर्षी चौथे लग्न; पत्नी आहे...

मस्क यांनी शनिवारी आपल्या ट्विट करून म्हटलं की, "ट्विटरवर जाहिराती खूप जास्त आणि खूप मोठ्या आहेत. यातून सुटका मिळविण्यासाठी अधिक पैसे माजून सब्सक्रिप्शनची सुविधा देण्यात येणार आहे. जे लोक ही सुविधा घेतील, त्यांना एकही जाहिरात दिसणार नाही, असंही मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

गेल्या वर्षाच्या अखेरीस मस्क यांनी कंपनीच्या साडेसात हजार कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या निर्णयामुळे कंपनीकडे कंटेंट मॉडरेशनसाठी अपुरे कर्मचारी आहेत. मस्क म्हणाले की, महसूल निर्माण करताना खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणे ही आपली रणनीती आहे. ट्विटरची ब्लू टीक सब्सक्रिप्शन सेवा हे उद्दिष्ट गाठण्यास मदत करेल.

कंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अमेरिकेत या सेवेची किंमत दरमहा ११ डॉलर असून अॅपलच्या आयओएस आणि गुगलच्या अँड्रॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमवर ही सेवा उपलब्ध आहे. वेब सब्सक्रिप्शन दरमहा 8 डॉलर किंवा, सवलतीसह प्रति वर्ष 84 डॉलरमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :TwitterElon Musk