
Buzz Aldrin : चंद्रावर चालणाऱ्या अंतराळवीराने केले ९३ व्या वर्षी चौथे लग्न; पत्नी आहे...
अमेरिकन अंतराळवीर बझ ऑल्ड्रिनने शुक्रवारी वयाच्या 93 व्या वर्षी चौथे लग्न केले. त्यांची पत्नी डॉ. अंका फॉर या 63 वर्षांच्या आहेत. खुद्द ऑल्ड्रिनने ट्विटरवर ही माहिती दिली. त्याने लिहिले - घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या किशोरांसारखे आम्ही दोघेही उत्साहित आहोत.
अपोलो 11 मोहिमेचा एक भाग म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन 1969 मध्ये चंद्रावर गेले होते. नील आर्मस्ट्राँग हे पहिले चंद्रावर उतरले होते. बझ ऑल्ड्रिनने त्याच्यानंतर 19 मिनिटांनी चंद्रावर पाऊल ठेवले.
93 व्या वाढदिवसानिमित्त केले लग्न :
बझ आल्ड्रिनने लग्नानंतर पत्नी अंकासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले- माझ्या 93 व्या वाढदिवसानिमित्त, मला हे कळवण्यास आनंद होत आहे की, मी माझ्या प्रिय डॉक्टर अंका फॉर यांच्याशी लग्न केले आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका छोट्याशा समारंभात आमचं लग्न झालं.
हेही वाचा: Bank FD : भारीच! पैसाच पैसा, दर महिन्याला मिळतेय 8.25% व्याज, आता आणखी काय हवंय...
ट्विटर वापरकर्त्यांनी केले अभिनंदन :
बझ ऑल्ड्रिनच्या पोस्टला आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ट्विटर युजर्स त्यांचे अभिनंदन करत आहेत. एका यूजरने लिहिले - तुम्हाला चंद्रावर उतरल्यासारखे वाटत असेल. दुसर्या यूजरने लिहिले- वाढ
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या लग्नासाठी शुभेच्छा.
हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
अपोलो मिशनचे एकमेव जिवंत सदस्य :
अपोलो 11 च्या तीन सदस्यांच्या क्रूमधील बझ ऑल्ड्रिन हा एकमेव जिवंत सदस्य आहे. मिशनमध्ये त्यांच्यासोबत गेलेल्या इतर दोन सदस्यांचे निधन झाले आहे.
बझ ऑल्ड्रिन 1971 मध्ये नासातून निवृत्त झाले. त्यांनी 1998 मध्ये शेअर स्पेस फाउंडेशनची स्थापना केली. त्याचा उद्देश अवकाश संशोधनाला चालना देणे हा आहे.