Aditya L1 Update : 'आदित्य' सहा जानेवारीला पोहोचणार 'एल-1' पॉइंटवर; इस्रो प्रमुख सोमनाथ यांची माहिती

‘आदित्य’वरील सहाही उपकरणांची चाचणी करण्यात आली असून, ते सुस्थितीत असून उत्तम माहिती पाठवत असल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली.
Aditya L1 Point
Aditya L1 PointeSakal

Aditya L1 Mission Update : भारताची पहिली अंतराळ सौर वेधशाळा, अर्थात ‘आदित्य’ उपग्रह जानेवारीच्या सहा तारखेला निश्चित केलेल्या एल-1 स्थानावर पोहोचणार आहे. पृथ्वीपासून सूर्याच्या दिशेने १५ लाख किलोमीटर अंतराचा प्रवास आदित्य पूर्ण करेल, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. यावर्षी सप्टेंबर महिन्यात आदित्य एल-1 लाँच करण्यात आले होते. (ISRO Sun Mission)

मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी मुंबई) आयोजित टेक-फेस्ट (Tech Fest) कार्यक्रमात सोमनाथ बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आदित्य आता निश्चित केलेल्या स्थानाच्या जवळ पोचला आहे. शनिवारी (ता.६ जानेवारी) दुपारी चार वाजता तो लॅग्रेंज पॉइंटवर स्थिर होईल. अतिशय नियंत्रित पद्धतीने इंजिनाचे प्रज्वलन करत, तो हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करेल.’’ (S. Somnath on Aditya L1)

‘आदित्य’वरील सहाही उपकरणांची (Aditya L1 Payloads) चाचणी करण्यात आली असून, ते सुस्थितीत असून उत्तम माहिती पाठवत असल्याची माहिती सोमनाथ यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आदित्य एल-१ कार्यरत झाल्यानंतर सौर प्रभामंडळ, सौर वादळे आणि अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम यांची अधिक माहिती मिळेल.’’

Aditya L1 Point
ISRO New Mission : चंद्र-सूर्यानंतर आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार इस्रो; नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाँच होणार मिशन

वर्षाच्या सुरुवातीलाच इस्रोचा धमाका

2023 सालामध्ये चांद्रयान-3 सह (Chandrayaan 3) आणखी कितीतरी मोहिमा इस्रोने यशस्वीपणे पार पाडल्या. यानंतर आता नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात इस्रो डबल धमाका करणार आहे. 1 जानेवारी रोजी इस्रो कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी XPoSat हा उपग्रह लाँच करेल. त्यानंतर 6 जानेवारी रोजी आदित्य एल1 मोहीम देखील पूर्णत्वाला येणार आहे. एल-1 पॉइंटवर आदित्य उपग्रह प्रस्थापित झाल्यानंतर ही मोहीम यशस्वी झाल्याचं स्पष्ट होईल.ेेे

लॅग्रेंज पॉइंट काय असतात?

लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) या अवकाशातील अशा जागा असतात, जिथे सूर्याचं गुरुत्वाकर्षण आणि जवळच्या एखाद्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण बल हे समान असतं. यामुळे या पॉइंटवर ठेवण्यात आलेली वस्तू एकाच ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी जास्त उर्जा खर्च करण्याची गरज भासत नाही. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 हा लॅग्रेंज पॉइंट आहे. येथे स्थिरावलेली कोणतीही वस्तू सूर्याभोवती पृथ्वीसारखेच भ्रमण करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com