स्वस्तात दमदार फीचर्स, Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11s लॉंच

Infinix Hot 11, Infinix Hot 11s
Infinix Hot 11, Infinix Hot 11s Google

Infinix ने आपले दोन नवीन स्मार्टफोन Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S भारतात लॉन्च केले आहेत. कंपनीने हे दोन्ही हँडसेट बजेट सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स हे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येतात. कंपनीने Infinix Hot 11 हा चार कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केला आहे ज्यामध्ये तुम्हाला 7-डिग्री पर्पल, एमराल्ड ग्रीन, पोलर ब्लॅक आणि सिल्व्हर वेव्ह. त्याचबरोबर, हॉट 11S पोलर ब्लॅक, 7-डिग्री पर्पल आणि ग्रीन वेव्ह या रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Infinix Hot 11 चे फीचर्स

Infinix Hot 11 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच FHD+ डिस्प्ले आहे, ज्याची ब्राइटनेस 500 nits आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G70 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित XOS 7.6 वर काम करतो.

या फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर असलेल्या या फोनला 5200mAh बॅटरी दिली आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 वर काम करतो.

Infinix Hot 11, Infinix Hot 11s
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 213 किमी

Infinix Hot 11s ची वैशिष्ट्ये

Infinix Hot 11s स्मार्टफोनला डायमंड कट डिझाइन देण्यात आले आहे. यात 6.78-इंच FHD+ डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz, स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. NEG ग्लास त्याच्या संरक्षणासाठी वापरला गेला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह, फोनला लेटेस्ट Android 11 आधारित XOS 7.6 साठी सपोर्ट मिळेल.

Infinix Hot 11S स्मार्टफोन मध्ये 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून फ्रंटला 8 एमपी कॅमेरा आहे. या फोनच्या कॅमेऱ्याने 2K Bokeh व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. याशिवाय फोनला स्लो-मोशन, सुपर नाईट आणि टाइम-लेप्ससाठी सपोर्ट मिळेल.

Infinix Hot 11s स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्पीकर्स आणि DTS सराउंड साउंड टेक्नॉलॉजी दिली आहे. या फोनमध्ये गेमिंगसाठी डार-लिंक गेम बूस्ट टेक्नोलॉजी मिळेल. तसेच या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. यासोबतच कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ब्लूटूथ आणि वाय-फाय सारखी सुविधा देण्यात आली आहे.

Infinix Hot 11, Infinix Hot 11s
TVS Raider 125 बाईक लॉंच, काय असेल किंमत? पाहा

Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11s किंमत

कंपनीने Infinix Hot 11 ची किंमत 8,999 रुपये ठेवली आहे. या किंमतीत तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरियंट फोन खरेदी करता येईल. तर Infinix Hot 11S चा 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटती किंमत 10,999 रुपये असणार आहे. या फोनची विक्री 21 सप्टेंबरपासून सुरू होईल, दरम्यान Infinix Hot 11 च्या विक्रीविषयी माहिती अद्याप मिळालेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com