Redmi A1 : रेडमीचा आणखी एक स्वस्त फोन येतोय ६ सप्टेंबरला, जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affoardable redmi a1 smartphone india launch date set for september 6 check all details here

Redmi A1 : रेडमीचा आणखी एक स्वस्त फोन येतोय ६ सप्टेंबरला, जाणून घ्या डिटेल्स

नवीन फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर 6 सप्टेंबर रोजी Redmi अनेक स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने शुक्रवारी जाहीर केले की Redmi A1 भारतात 6 सप्टेंबर रोजी लॉन्च केला जाईल. त्याच दिवशी कंपनी आपली Redmi 11 प्राइम सीरीज देखील लाँच करणार आहे.

Redmi A1 ला कंपनीचा बजेट स्मार्टफोन म्हटले जात आहे. कंपनीच्या मायक्रोसाइटनुसार, A1 मीडियाटेक चिपसेटद्वारे समर्थित असेल आणि क्लीन Android एक्सपिरीएंस देईल आणि फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. तसेच स्मार्टफोनला लेदर टेक्सचर रीअर पॅनल देखील मिळू शकते. Redmi नुसार, फोन 5000mAh बॅटरीसह येईल.

काय खास असेल?

मायक्रोसाइटनुसार, Redmi A1 ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलरमध्ये येईल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, डिव्हाइसमध्ये लेदर टेक्सचर बॅक पॅनल आहे. यात चौरस आकाराचा कॅमेरा मॉड्यूल दिला असून यामध्ये एलईडी फ्लॅशसह कॅमेरा सेन्सर आहेत. स्मार्टफोनमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर असल्याचे दिसते. सिम कार्ड ट्रे डावीकडे आहे तर पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे उजवीकडे आहेत. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले नाही.

हेही वाचा: 'ट्विटर'कडून 45 हजारांहून अधिक भारतीयांची खाती बॅन, तुम्हीही टाळा या चुका

तसेच Redmi A1 मध्ये वॉटरड्रॉप नॉच मिळते. फोन 5000mAh बॅटरीसह येतो. डिव्हाइस मध्ये MediaTek Helio प्रोसेसर देण्यात येण्याची शक्यता आहे, Geekbench लिस्टींगनुसार हे Helio A22 3GB RAM सह येणे अपेक्षित आहे. Redmi A1 बद्दलची उर्वरित माहिती सध्या समोर आलेली नाही. Redmi A1 स्मार्टफोन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: किआ ने लॉन्च केली Sonet X-Line; किंमत 13.39 लाख, जाणून घ्या फीचर्स

Web Title: Affoardable Redmi A1 Smartphone India Launch Date Set For September 6 Check All Details Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology