कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स | 7 Seater Car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Seven seater car

कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

जर तुम्ही फॅमिली कार घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट जास्त नसेल तर काळजी करु नका भारतीय बाजारात अशा अनेक 7 सीटर कार्स उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला तुमच्या कमी बजेटमध्ये देखील खरेदी करणे परवडेल. म्हणजेच कमी बजेटमध्ये देखील तुमचे फॅमिली कारचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आज आपण अशाच काही कार ऑशन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

मारुती अर्टिगा (Maruti Ertiga)

मारुती एर्टिगा ही मारुती सुझुकीची कार असून ही 7 सीटर कार तीही कमी बजेटमध्ये मिळणारी फॅमिली कार म्हणून तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकते. या कारची किंमत 7,96,500 रुपयांपासून सुरु होते आणि ही तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये देखील खरेदी करू शकता

ही कार पेट्रोलवर 17.99 ते 19.01 kmpl, तर CNG वर 26.08 kmpl मायलेज देते. या कारमध्ये 1462 cc, K15B SMART HYBRID BS6 इंजिन दिले आहे. त्याची फ्यूल टाकीची क्षमता 45 लिटर आहे.

रेनॉ ट्रायबर (Renault Triber)

Renault कंपनीची कार Renault Triber देखील कमी बजेटमध्ये तुमची फॅमिली कार बनण्याची क्षमता आहे. कारची किंमत (रेनॉल्ट ट्रायबर) रुपये 5,54,000 असून यामध्ये देखील तुम्हाला 7 सीट देण्यात आले आहेत. या कारमध्ये तुमची सात जणांची फॅमिली आरामात प्रवास करू शकते.

या कारमध्ये 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल एनर्जी इंजिन (ड्युअल VVT एनर्जी इंजिन) देण्यात आले आहे. यात इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंग असून सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्लोबल NCAP ने या कारला अडल्ट्ससाठी 4 स्टार आणि लहान मुलांसाठी 3 स्टार रेटिंग दिले आहे.

हेही वाचा: मतदार ओळखपत्रात घरबसल्या अपडेट करा नवीन पत्ता, वाचा सोपी प्रोसेस

डॅटसन गो प्लस (DATSUN GO+)

तुम्ही Datsun ब्रँडच्या Datsun GO Plus या कारचाही विचार करू शकता. ही देखील 7 सीटर कार असून हीची किंमत 4,25,926 रुपयांपासून सुरु होते. या कार मध्ये 1.2 L 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे.

तसेच Datsun GO+ अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), फर्स्ट-इन-सेगमेंट व्हेईकल डायनॅमिक कंट्रोल (VDC), ड्युअल-एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट (BA) आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम (बीए) असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Airtel चे प्रीपेड रिचार्ज प्लॅन महागले! जाणून घ्या नवीन किंमती

loading image
go to top