फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट रिचार्ज प्लॅन | Best Prepaid Plans for Jio, Airtel and VI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Prepaid Plans for Jio, Airtel and VI

फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans : Jio, Airtel आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांचे प्री-पेड प्लॅन डिसेंबर 2021 पासून महाग झाले आहेत, त्यानंतर रिचार्ज करताना लोकांच्या खिशांवर जास्तीचा ताण पडतोय . तुमच्यापैकी बरेच लोक असतील ज्यांना फक्त तुमचा नंबर चालू ठेवण्यासाठी रिचार्ज करायचा आहे, परंतु चांगला प्लॅन माहिती नसल्यामुळे, अडचण येत आहे. (Best Prepaid Plans for Jio, Airtel and VI)

Airtel, Jio आणि Vodafone Idea या तिन्ही कंपन्यांकडे असे काही प्लॅन आहेत, ज्यात डेटा कमी मिळतो पण अनलिमीटेड कॉलिंगसाठी व्हॅलिडीटी जास्त मिळते. आज आपण तिन्ही कंपन्यांचे असेच काही प्रीपेड प्लॅन्स (prepaid Plans) जाणून घेणार आहोत.

जिओचे प्लॅन (Jio Plans)

जिओने असे प्लॅन लपवून ठेवले आहेत. जिओकडे या प्रकारचे तीन प्लॅन आहेत जे कोणत्याही थर्ड पार्टी रिचार्ज प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीत. या प्लॅनमध्ये कमी पैशात रिचार्ज करून तुम्ही जास्त काळासाठी वैधता मिळवू शकता. जिओचा 155 रुपयांचा प्लॅन आहे ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये फक्त 2 GB डेटा मिळतो. याशिवाय यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आणि 300 मेसेज पाठवण्याची सुविधा दिली आहे.

जिओचा 395 रुपयांचा आणखी एक प्लॅन आहे ज्यामध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये एकूण 6 जीबी डेटा उपलब्ध आहे. तुम्हाला कमी किमतीत दीर्घ वैधतेचा रिचार्ज हवा असेल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह 1000 मेसेज देखील मिळतात. जिओचा 1,559 रुपयांचा प्लॅन असून त्याची वैधता 336 दिवस आहे. यामध्ये एकूण 24 जीबी डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 3,600 मेसेज देखील मिळतात.

हेही वाचा: 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी! परीक्षेविना मिळेल रेल्वेत नोकरी

एअरटेलचे प्लॅन (Airtel Plans)

एअरटेलचा 99 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 200MB डेटा आणि त्याची वैधता 28 दिवस आहे. तुम्हाला फक्त कॉल करायचा असेल तर हे रिचार्ज बेस्ट आहे.

व्होडाफोन आयडियाचे प्लॅन (Vi Plans)

Vodafone Idea चा 99 रुपयांचा प्लॅन देखील आहे ज्यामध्ये 99 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. या प्लॅनमध्ये 200MB डेटा उपलब्ध आहे आणि त्याची वैधता 28 दिवस आहे. तुम्हाला फक्त कॉल करायचा असेल तर हे रिचार्ज बेस्ट आहे. याशिवाय 79 रुपयांचा प्लॅन आहे ज्यामध्ये 64 रुपयांचा टॉकटाइम तसेच 200 MB डेटा मिळतो.

हेही वाचा: Honda Shine 125cc ची अनोखी शाईन! ठरली 1 कोटी ग्राहकांची पहिली पसंत

Web Title: Affordable Best Jio Vs Airtel Vs Vi Recharge Plans Unlimited Calling And Data Benefits Check

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JioAirtel