देशातील टॉप स्वस्त सीएनजी कार, ज्या देतात दमदार मायलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Suzuki Celerio

देशातील टॉप स्वस्त सीएनजी कार, ज्या देतात दमदार मायलेज

पेट्रोल आणि डिझेल कार लोक मोठ्या सर्वाधिक प्रमाणात प्रदूषण करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता कार वापरणाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. असात अनेक जण त्यांच्या कारचा वापर कमी करतात. तुमचे देखील पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे दर महिन्याचे बजेट कोलमडत असेल , तर आज आपण भारतात उपलब्ध असलेल्या अत्यंत किफायतशीर CNG गाड्यांविषयी जाणून घेणार आहोत ज्या चालवण्याचा खर्च अत्यंत कमी आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)

मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी ही कार तब्बव 30.47 km/kg मायलेज देते, सेलेरियो ही भारतात उपलब्ध असलेली एक अतिशय स्वस्त कार आहे, मारुती सुझुकी सेलेरियो सीएनजी कारमध्ये 1.0-लिटर इंजिन देण्यात आले आहे जे 57 पीएस पावर आणि 78 न्यूटन मीटर पिक टॉर्क जनरेट करते. या कारचे सीएनजी मॉडेल खरेदी करण्यासाठी दोन व्हेरियंट VXI आणि VXI(O) ऑप्शन्स मिळतील, ज्याची किंमत 5,95,000 रुपयांपासून सुरु होते.

मारुती सुझुकी वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

मारुती सुझुकी वॅगनआर देखी सीएनजी कारसाठी बेस्ट ऑप्शन आहे. या कारच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 1.0-लिटर 3-सिलेंडर इंजिनद्वारे चालविली जाते जी 57 PS ची पॉवर आणि 78 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज 2.52 km/kg आहे. ही कार LXI आणि LXI (O) व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे ज्याची किंमत 5,83,000 रुपयांपासून सुरू होते.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)

मारुती सुझुकीची अल्टो देशातील सर्वात पॉप्युलर कार आहे. या कारमध्ये तुम्हाला 0.8 लीटर चे इंजन मिळते जे 40 ps ची पावर आणि 60 NM चा पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी अल्टो सीएनजी 31.59 km/kg चे जबरदस्त मायलेज देते. ही कार तुम्हाला एलएक्सआय आणि एलएक्सआय (ओ) मॉडेल ऑप्शन्समध्ये खेरेदी करता येईल, या कारची किंमत 4,76,000 लाख रुपयांपासून सुरू होते.

ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro)

ह्युंदाई सॅन्ट्रो ही 1.2 लीटर 4-सिलेंडर इंजिन असलेली लोकप्रिय हॅचबॅक कार आहे ज्यामध्ये 7ps ची पॉवर आणि 25 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. या कारचे मायलेज 30.48 30.48 km/kg असून. या कारचीकिंमत 5,99,900 लाख रुपयांपासून सुरु होते.

टॅग्स :Technology