esakal | भारतातील 'या' आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, पाहा किंमत
sakal

बोलून बातमी शोधा

Hyundai Aura

भारतातील 'या' आहेत सर्वात स्वस्त सेडान कार, पाहा किंमत

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सेडान कार भारतात खूप पसंद केल्या जातात सामान्य कारच्या तुलनेत या कारमध्यये ग्राहकांना जास्त कंफर्ट आणि स्पेस मिळतो. पण या कारची किंमत ही हॅचबॅक कारपेक्षा जास्त आहे, त्यामुळे लोक सेडान कार खरेदी करणे टाळतात. पण सध्या अनेक मोटार कंपन्या या बजेटमध्ये बसतील अशा सेडान कार्स बाजारात घेऊन येत आहेत, ज्यांची किंमत कमी आणि फीचर्स बेस्ट आहेत, आज आपण अशाच काही कारच्या मॉडल्स बद्दल जाणून घेणार आहोत.

टाटा टिगोर (Tata Tigor)

Tata Tigor ही टाटा मोटर्सची लोकप्रिय सेडान कार आहे ज्यात ग्राहकांना 1.2 लीटर 3-सिलेंडर इंजिन दिले जाते जे मॅक्झिमम 86 पीएस पॉवर आणि 113 न्यूटन मीटरचे पीक टॉर्क जनपेट करू शकते. ही कार भारतात 5.64 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) खरेदी केली जाऊ शकते.

ह्युंदाई ऑरा (Hyundai Aura)

ह्युंदाई ऑरा ही एक प्रीमियम सेडान कार आहे ज्या कारमध्ये लहान कुटुंबानुसार भरपूर स्पेस देण्यात आला आहे. या प्रिमियम कारचे इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यायमध्ये 1.2 लिटर आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शन्स दिले आहेत. जर आपण डिझेल इंजिन 1.2 लिटर युनिटचे आहे. ज्यामध्ये दूरच्या प्रवासादरम्यान चांगले मायलेज मिळेल. ही कार भारतात 5.99 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

हेही वाचा: Samsung F सीरीजचा पहिला 5G फोन, 29 सप्टेंबरला होणार लॉंच

मारुती सुझुकी डिजायर (Maruti Suzuki dzire)

Maruti Suzuki dzire ही एक प्रीमियम कॉम्पॅक्ट सेडान कार आहे जी इतर सेडान करपेक्षा आकाराने लहान आहे, तरीही या कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. ग्राहकांना या कारमध्ये भरपूर केबिन स्पेस मिळते. इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना या कारमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये तुम्हाला अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, मागील पार्किंग सेन्सरसह ड्युअल एअर बॅग आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्यूशन देण्यात आले आहे. या सेफ्टी फीचर्समुळे तुमचा प्रवास अतिशय आरामदायक आणि सुरक्षित बनतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ही कार भारतात 5.98 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) किंमतीत खरेदी करता येईल.

हेही वाचा: 'प्रिसिजन'ने केली रेट्रोफिटेड इलेक्‍ट्रिक बसची निर्मिती!

loading image
go to top