Lava चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉंच, तुमच्या बजटमध्ये मिळेल 50MP कॅमेरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

affordable lava blaze pro launched in india with 50mp camera check price here

Lava चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन लॉंच, तुमच्या बजटमध्ये मिळेल 50MP कॅमेरा

Lava ने Blaze सीरीज अंतर्गत कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Lava Blaze Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन मोठी बॅटरी, साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर, ट्रिपल रिअर कॅमेरे आणि बर्‍याच दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. Lava Blaze Pro हा फोन 11,000 पेक्षा कमी मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, म्हणूनच तो Redmi 10 Power, Realme C35 सारख्या मार्केटमधील इतर बजेट स्मार्टफोनशी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊया या फोनची सर्व माहिती

Lava Blaze Pro ची किंमत

हा स्मार्टफोन Glass Gold, Glass Green, Glass Blue आणि Glass Orange रंगात सादर करण्यात आली आहे. या फोनची किंमत 10,499 रुपये ठेवण्यात आली असून तुम्ही फ्लिपकार्ट आणि लावाच्या वेबसाइटवरून फोन खरेदी करू शकता.

Lava Blaze Pro चे फीचर्स

Lava Blaze Pro मध्ये HD+ रिझोल्यूशनसह 6.5-इंचाचा डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. पॉवर बटण फिंगरप्रिंट स्कॅनरच्या रूपात देण्यात आले आहे. मागील बाजूस, फोनमध्ये फ्रॉस्टेड ग्लास बॅक पॅनेलवर आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मिळते.

हेही वाचा: IIT Bombay : मोहालीनंतर IIT मुंबईत मुलीचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार, एकाला अटक

कॅमेरा बद्दल बोलायचे झाल्याल Lava Blaze Pro मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 6x झूम सपोर्ट, 2MP डेप्थ आणि 2MP मॅक्रो लेन्ससह 50MP प्रायमरी सेन्सर दिले आहे. स्मार्टफोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देखील मिळतो.

प्रोसेसर आणि रॅम - Lava Blaze Pro MediaTek Helio G37 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोन 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो.फोनमध्ये 3GB व्हर्चुअल रॅम फीचर देखील आहे. स्मार्टफोन 10W चार्जिंगसह 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. तसेच हा फोन आउट ऑफ द बॉक्स Android 12 OS वर चालतो

हेही वाचा: लिक झालेला MMS पॉर्न वेबसाइटवरून कसा काढाल? येथे जाणून घ्या पध्दत

Web Title: Affordable Lava Blaze Pro Launched In India With 50mp Camera Check Price Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..