Low Budget Electric Cars: नव्या वर्षात कार घेताय? पुढल्या वर्षी लाँच होणार या लो बजेट कार; किंमत.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Low Budget Electric Cars

Low Budget Electric Cars: नव्या वर्षात कार घेताय? पुढल्या वर्षी लाँच होणार या लो बजेट कार; किंमत..

Electric Cars: सध्या इलेक्ट्रिक व्हेइकल्सचं सगळीकडे क्रेज दिसून येतं. त्यातच आता पुढल्या वर्षी तीन नव्या कार लाँच होणार असल्याची माहिती पुढे येतेय. तुम्हीही जर का नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर या नव्या कारबाबत जाणून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. तसेच या कार्स अफोर्डेबल रेंजमध्ये उपलब्ध होऊ शकतात. जाणून घ्या येणाऱ्या कार्सचे नव्या कारचे फिचर आणि किंमत.

Tata Tiago EV (टाटा टियागो)

मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या कार्समध्ये मागल्या वर्षी काही चांगल्या कार्सचं प्रदर्षन भरवण्यात आलं होतं. नुकतीच काही काळापूर्वी देशात स्वस्त दरातील इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आली. टाटा टियागो असे या कारचे नाव आहे. या कारची डिलेवरी नव्या वर्षापासून सुरू करण्यात येईल. ही कार 250 किमी ते 315 किमी रेंज देते. टाटाच्या या कारमध्ये 3.3kW चा AC चार्जरही मिळेल.

MG Air EV (एमजी एअर ईव्ही)

वाहन उत्पादक कंपनी एमजी मोटर्सने अलीकडेच घोषणा केलीय की ते लवकरच देशात अफोर्डेबल इलेक्ट्रिक कार Air EV लाँच करणार आहेत. या कारला टेस्टींगसाठीही स्पॉट केल्या गेलंय. एमजी कंपनीने सगळ्यात आधी २०२० मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये या कारला शोकेस केलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार एमजी कंपनी २०२३ मध्ये ऑटो एक्सपोमध्ये ही कार लाँच करणार आहे.

Citroen C3 EV (सिट्रोएन)

फ्रांसची कंपनी सिट्रोएन त्यांच्या एन्ट्री लेवलच्या हॅचबॅकला कार C3चं इलेक्ट्रिक वर्जन २०२३ मध्ये आणणार असल्याचं कळतंय. या कारच्या पेट्रोल वर्जनची सुरूवाती किंमत १० लाख रुपये असू शकते. या कारची लाँचिंग पुढल्या वर्षीच्या सुरुवातील होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात सगळ्यात स्वस्त विकली जाणारी कार टाटा टिगर आहे. या कारची विक्री पुढल्या वर्षापासून सुरु केली जाईल.

नव्या वर्षात कार घेणाऱ्यांसाठी या काही बिना पेट्रोलच्या इलेक्ट्रिक कार बेस्ट ठरू शकतील. तुम्हीही या कारचा विचार करू शकता.